सुपर फास्ट महाराष्ट्र न्यूज पोर्टल मध्ये आपले स्वागत आहे.जाहिरातीसाठी संपर्क करा.superfastmaharashtraa@gmail.com

राळेगाव तालुक्यात महावितरण कंपनीची मनमानी

राळेगाव तालुक्यात महावितरण कंपनीची मनमानी 




 वृषभ दरोडे ,
तालुका प्रतिनिधि ,राळेगाव

राळेगाव शहरासह संपुर्ण  तालुक्यात विजेचा लपंडाव नेहमीच सुरू आहे. पुर्वी विज काही मिनीटांसाठी जायची पण आता तासांसाठी जाते.त्यामुळे महाविताराण ज्या प्रमाणे कर वसुली वर भर देते .त्याच प्रमाणे ग्राहकांना सेवा दिली पाहीजे वीज ग्राहकांना चोवीसतास वीज दयावी अशी मागणी शहरासह तालुक्यातील संपुर्ण नागरीक करीत आहे.सध्या शहरासह तालुक्यात पावसाचे दिवस असल्यामुळे रात्री नागरीकांचे हाल होत आहे.चार पाच तास लाईन जात असेल तर जेष्ठ नागरीक लहानमुले यांचे काय हाल होत असेल याचा विचार न केलेला बरा  एकदा ही लाईन गेली नाही असा दिवस अलीकडच्या काळात नाही.दररोज चार ते पाच तास लाईन जातेच  वीज पुरवठा इतका खंडीत होतो कि इनवेटर सुध्दा काम करीत नाही पुवींं लाइन जायची तर त्याबाबत वेळापत्रक मोबाईल वर यायच पण अलीकड च्या काळात कितीतरी तासांसाठी लाइन जाते पण त्याचा कुठलाही मॅसेज नागरीकांना येत नाही . केव्हाही लाइन जाते व केव्हाही येते शहरासह तालुक्यातील नागरिकांना कमी जास्त व्होलटेज चा सुध्दा सामना करावा लागतो.कधी कधी विजेचा व्होलटेज वाढते तर कधी कधी कमी होते त्यामुळे टिव्ही, फिज, एसी, कुलर आदी महागडी उपकरणे खराब होत आहे.तालुक्यातील विभागाचे आमदार प्रा.डाॅ.अशोकराव उईके ऋयांच्या पुढाकाराने 132 केव्ही उपकेंद्रचे  काम तीन वर्षा पासुन चालु आहे.या कडे आ. अशोक राव उइके यांनी लक्ष्य द्यावे अशी मागणी तालुक्यातील नागरिकां मधुन जोर धरू लागली आहे.
सुपर फास्ट महाराष्ट्र न्यूज आमच्या पोर्टला व्हिसिट केल्याबद्दल आपले आभारी आहोत.जाहिरातीसाठी संपर्क करा.superfastmaharashtraa@gmail.com