सुपर फास्ट महाराष्ट्र न्यूज पोर्टल मध्ये आपले स्वागत आहे.जाहिरातीसाठी संपर्क करा.superfastmaharashtraa@gmail.com

वीज वितरण विभागाचे आणखी 5 कर्मचारी कोरोनाबधित*

सुपर फास्ट प्रतिनिधी : जिज्ञासु चाफले .

*वीज वितरण विभागा

चे  आणखी 5 कर्मचारी कोरोनाबधित*


वर्धा, दि 5 :-  चक्रीवादळामुळे  कोकणात खंडित झालेला वीज पुरवठा सुरळीत करण्याचे काम करून परत आलेले वीज वितरण विभागाचे आणखी 5 कर्मचारी आज कोरोना बाधित असल्याचे निदान झाले. यात 3 कर्मचारी हिंगणघाट (वय 55 पु, 29 पु, 30 पु, )तर दोन देवळी (50 पु ,40 पु.) तालुक्यातील आहेत. अशी माहिती जिल्हा आरोग्य अधिकारी यांनी दिली.

कोकणात चक्रीवादळामुळे  नुकसानग्रस्त भागातील वीज वितरण विभागाची दुरुस्तीची कामे करण्यासाठी 20 कर्मचारी वर्धा जिल्ह्यातून गेले होते. परतल्यानंतर  त्यातील  3 कर्माचारी काल कोरोना बाधित निघाल्यावर उर्वरित कर्मचाऱ्यांची कोरोना चाचणी करण्यात आली. यातील आज प्राप्त 12 अहवालात  5 व्यक्ती कोरोनाबाधित निघाल्या आहेत. तर 2 नेगेटिव्ह आणि 5 अहवाल इनकनक्लुसिव्ह  आहेत. यामध्ये 3 कर्मचारी हिंगणघाट मधील असून एक पुलगाव आणि एक विजयगोपाल येथील आहे. हिंगणघाट मधील बाधित कर्मचाऱ्यांना सेवाग्राम रुग्णालयात तर देवळी मधील रुग्णांना सावंगी मेघे येथील रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात येणार आहे अशी माहिती जिल्हा शल्य चिकित्सक यांनी दिली. 
या रुग्णासहित जिल्ह्यातील कोरोना रुग्णांची संख्या 27 झाली असून त्यातील 12 कोरोनामुक्त तर 14 ऍक्टिव्ह रुग्ण आहेत. एकाचा पूर्वीच मृत्यू झाला आहे.

बातमी आणि जाहिराती साठी संपर्क
- 7770096996
- 7741864156
सुपर फास्ट महाराष्ट्र न्यूज आमच्या पोर्टला व्हिसिट केल्याबद्दल आपले आभारी आहोत.जाहिरातीसाठी संपर्क करा.superfastmaharashtraa@gmail.com