कोरडवाहू क्षेत्र विकास योजनेचे अनुदान मिळण्यासाठी कुंभेफळ ग्रामस्थांचे तहसील समोर उपोषण*
*कोरडवाहू क्षेत्र विकास योजनेचे अनुदान मिळण्यासाठी कुंभेफळ ग्रामस्थांचे तहसील समोर उपोषण*
शाश्वत शेती अभियानांतर्गत अहमदनगर जिल्ह्यामध्ये कुंभेफळ गावाची निवड करण्यात आली होती. या योजने अंतर्गत कोरडवाहू क्षेत्र विकास अभियान म्हणून शेतकऱ्यांना दुग्ध जनावरांचे वाटपासाठी प्राध्यापक राम शिंदे यांच्या सहकार्यातून 25 लाख रुपयांचा निधी दिला गेलेला होता. आणि त्या माध्यमातून कृषी खात्याच्या अंतर्गत संकरित गाई खरेदीसाठी प्रत्येकी लाभार्थ्याला 20 हजार रुपयाचे अनुदान मिळणार होतं. मात्र प्रत्यक्षात बारा लाख रुपयांचा निधी कुंभेफळ गावासाठी देण्याचे नियोजन करण्यात आले आणि बारा लाख रुपयांचा निधी लॅप्स करण्यात आला. हे सर्व कर्जत जामखेड मतदार संघात सत्तांतरानंतर घडलेल्या घडामोडी आहेत . डिसेंबर 2019 मध्ये कृषी खात्याने एक समिती स्थापन केली या समिती च्या समक्ष सर्व लाभार्थ्यांच्या गाई जेऊर जिल्हा सोलापूर या ठिकाणी खरेदी करण्यात आल्या आहेत. हे अनुदानाचे पैसे शिल्लक आहेत महिन्याभराच्या कालावधीमध्ये सर्व लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये जमा केले जातील असं कृषी खात्याच्या अधिकाऱ्यांनी सांगितलं . नंतर राजकीय दबावामुळे शासकीय अधिकारी वेगवेगळ्या प्रकारची उत्तरे देऊन शेतकऱ्यांना अपमानित करू लागले. या योजनेत लाभ घेणारे सर्व शेतकरी गरीब कुटुंबातील आहेत. योजना प्राध्यापक राम शिंदे यांनी दिली असल्या कारणास्तव कर्जत जामखेड मतदार संघाचे लोक प्रतिनिधी जाणून-बुजून राजकीय आकसापोटी शेतकऱ्यांना वेठीस धरण्याचे काम करत आहे आमची त्यांना हात जोडून कळकळीची विनंती आहे. अगोदरच अडचणीत असलेल्या शेतकऱ्यांना दिलासा देण्याऐवजी आर्थिक दृष्ट्या आणखी अडचणीत आणू नये. आता कृषी खात्यातर्फे सांगण्यात येत आहे निधी उपलब्ध झाला की दिला जाईल जर निधीच नव्हता तर गाय खरेदी करण्यासाठी का सांगितलं गेलं ? याचा खुलासा करण्यात यावा .निधी उपलब्धता असल्याशिवाय गाईंची खरेदी करणे हे कृषी खात्यातर्फे सांगण्यात येऊ शकत नाही. याचा अर्थ असा होतो की निधी हा उपलब्ध होता नंतर मतदारसंघातील लोक प्रतिनिधींनी त्याची इतरत्र विल्हेवाट लावल्याचे दिसून येत आहे ,आणि आता वेगवेगळ्या प्रकारच्या कारणांना अधिकाऱ्यांमार्फत समोर करण्याच कट कारस्थान रचले जात आहे. यामध्ये सर्वसामान्य लाभार्थी भरडला जात आहे याचा लोकप्रतिनिधीने सहानुभूतीपूर्वक विचार करून परत नेलेला निधी माघारी आणण्याची विनंती आम्हा सर्व गावकर्यां तर्फे करण्यात येत आहे. जर निधी वेळेत वर्ग झाला नाही तर या पेक्षा ही तिव्र आंदोलनाचा मार्ग अवलंबवा लागेल, त्यामुळे तत्काळ आम्हा ६४ लाभार्थ्यांच्या खात्यात आमचे अनुदान जमा करावे.
असे कुंभेफळ ग्रामस्थांनी निवेदनामध्ये सांगितले या या निवेदनावर ग्रामपंचायत सरपंच काकासाहेब धांडे, भारतीय जनता पार्टीचे तालुका समन्वयक पप्पू शेठ धोदाड, कर्जत तालुका भाजपा उपाध्यक्ष रामदास हजारे ,तालुका सरचिटणीस भारत मासाळ , ग्रामपंचायत सदस्य सचिन उकिरडे, महेंद्र धांडे, नवनाथ साहेबराव धोदाड, अंगद धोदाड, अंकुश धोदाड, काकासाहेब वाळुंजकर नंदू पाटील, रंजीत उकिरडे,बबन धांडे ,बाबासाहेब पाटील, योगेश धोदाड, राजेश धोदाड, अनिल रामदास धोदाड, शिवाजी पाडुळे,रज्जाक शेख,आकाश धोदाड, गोरक्षनाथ धोदाड, तेजेस कन्हेरे,अनिल पाटील,अक्षय उकिरडे, महादेव उकिरडे, कांतीलाल वाळुंजकर, अशोक धोदाड, मारुती धोदाड, संकेत. पाडुळे, ज्ञानदेव धोदाड, बाळासाहेब उकिरडे, दत्तात्रय धोदाड,दिपक साहेबराव पाटील, नागनाथ पाडुळे ,देविदास पाडुळे, बाळासाहेब रामभाऊ धोदाड, आजमुदीन शेख , दत्तात्रेय उकिरडे, नामदेव गुलाबराव धोदाड, आजिनाथ धोदाड, नारायन धोदाड,प्रविण धोदाड आदींच्या सह्या आहेत.
