सुपर फास्ट महाराष्ट्र न्यूज पोर्टल मध्ये आपले स्वागत आहे.जाहिरातीसाठी संपर्क करा.superfastmaharashtraa@gmail.com

कुंभेफळ निधी मिळु नये म्हणून आता तर पवार कार्यकर्त्यांचे ही प्रयत्न

कुंभेफळ निधी मिळु नये म्हणून आता तर पवार कार्यकर्त्यांचे ही प्रयत्न.



कर्जत वार्ताहर.
 2019 या वर्षा साठी राष्ट्रीय शाश्वत शेती अभियानांतर्गत कुंभेफळ गावांसाठी प्रा . राम शिंदे  यांनी दिलेला निधी उपलब्ध व्हावा यासाठी संपूर्ण गावकरी व लाभार्थ्यी तहसील कार्यालयावर उपोषणाला बसले होते. हा प्रश्न गेल्या आठ महिन्यांपासून रखडला आहे. गायी खरेदी साठी व्याजाचे पैसे काढलेल्या लाभार्थ्यांना आर्थीक दृष्ट्या खुप अडचणी येत आहेत. त्यामुळे गावकऱ्यांनी उपोषणाचा मार्ग अवलंबून आपली न्याय मागणी सरकार दरबारी मांडली तर यात गैर काय आहे..?. व याला जबाबदार स्थानिक लोकप्रतिनिधी नाही तर कोण आहे...? कुंभेफळ  गावातील जनतेचा निधीचा प्रश्न  लोकप्रतिनिधीं सोडवुन आधार द्यायला हवा होता. येथे मात्र उलट घडत आहे .आपल्या कार्यकर्त्यांना गावकऱ्यांवर उपोषण केले म्हणून कार्यवाही करण्यासाठी चे निवेदन द्यायला लावणारे लोकप्रतिनिधी हे महाराष्ट्रातील पहिले आमदार असतील. लोकशाही ची हत्या हे आज पर्यंत ऐकलं होतं. आता मात्र अनुभवायला ही भेटलं. कर्जत तालुक्यात शेतकरी आत्महत्या वाढत आहेत . म्हणुन  आर्थीक दृष्ट्या अडचणीत असलेल्या लोकांना आधार देण्याची वेळ आहे. लाभार्थ्यांच्या निधी उपलब्ध होण्यासाठी प्रयत्न करणं गरजेचं आहे. पण स्थानिक काही लोकांच आडमुठ वागण लाभार्थ्यांना पैसे मिळु नये यासाठी प्रयत्न करताना दिसत आहे . संकट समयी मदतीचा हातभार लावण्याऐवजी काही झारीतील शुक्राचार्य आपल्या नैतृत्वाचे पाय चाटत आहेत . गावातील गोरगरीब लाभार्थ्यी शेतकरी निधी साठी आंदोलन करत आहेत म्हणून कुंबेफळ ग्रामस्थांवर गुन्हे दाखल करण्यात यावे असे निवेदन देणारे  गावातीलच आहेत. याच दुःख संपूर्ण गावाला वाटत आहे . यापैकी काही जणांचे वडील निधीतील रुपरुपैयासाठी डोळे लावून बसले आहेत. मात्र आपल्या बापा पेक्षा ही काहींना  राजकारण महत्त्वाचे दिसत आहे.
सुपर फास्ट महाराष्ट्र न्यूज आमच्या पोर्टला व्हिसिट केल्याबद्दल आपले आभारी आहोत.जाहिरातीसाठी संपर्क करा.superfastmaharashtraa@gmail.com