सुपर फास्ट महाराष्ट्र न्यूज पोर्टल मध्ये आपले स्वागत आहे.जाहिरातीसाठी संपर्क करा.superfastmaharashtraa@gmail.com

नवरा व मुलाच्या कोरोना वर उपचारासाठी हरवलेले पावणे तीन लाख रुपये..... त्याने दिले आणून

नवरा व मुलाच्या कोरोना वर उपचारासाठी हरवलेले पावणे तीन लाख रुपये..... त्याने दिले आणून


प्रतिनिधी Dr अमोल जाधव

सहज सापडलेले पावणेतीन लाख रुपये या माणसाने त्या महिलेला परत केले जिचा पती आणि मुलगा कोरोनावर औरंगाबादमध्ये उपचार घेत आहेत.
__________________
*देवाक काळजी*
तसा माझा वाढदिवस 10 जुलै म्हणजे ऊद्या. परंतु ऊद्या पासुन औरंगाबादेत संचारबंदी असल्यामुळे आजच रक्तदान करण्यासाठी गेलो.तसेही एका थॅलेसेमियाच्या पेशंटला दर तीन महिन्यांनी रक्त देतोच ती वेळही आली होतीच.दत्ताजी भाले रक्तपेढीतले सोपस्कार आटोपून एका कामासाठी चिकलठाणा येथे जात असताना मधे काही खरेदी करण्यासाठी MGM हॉस्पिटल जवळील नेहमीच्या सुपर शॉपीजवळ थांबलो. गाडी सावलीत पार्क करून सुपरशॉपी जवळ माझ्या नंबरची वाट पहात ऊभा होतो. त्या चौकात नेहमीच पेशंटची वर्दळ असते. माझी नजर जवळच पडलेल्या एका रुमालात बांधलेल्या गाठोडेवजा वस्तुकडे गेली. कचरा/ऊष्ट अन्न असेल असं काही वाटत नव्हतं.उत्सुकतेपोटी परंतु भीतभीतच पोतडी पायानी चाचपली तर लक्षात आले की त्या गाठोड्यात नोटांची बंडलं होती. हॉस्पिटल जवळ पडलेलं गाठोडं म्हणजे सहाजिकच कुठल्यातरी पेशंटच्या संबंधितांचे हे पैसे असणार हे लक्षात आले. उघडून बघितले तर 500-500 चे सहा बंडलं होती. सोबत एक सोनाराची चिठ्ठीवजा पावती दिसली .लक्षात आलं की कोणीतरी सोनं मोडुन पैसे जमा केले होते. हॉस्पिटलच्या सेक्यूरिटीला कल्पना दिली व माझा फोन नंबर दिला. कोणी पैसे हरवले म्हणून आले तर मला फोन करायला सांगा असा निरोप दिला व तिथेच थांबलो. दरम्यान एका सोनार मित्राला, अरुणजी कदम यांना फोन करून त्या सोनाराची माहिती विचारली. दरम्यान तिथे काही लोकं जमा झाली होती. हॉस्पिटलच्या मॅनेजमेंटला फोन करुन सुचना देण्याचा अयशस्अयशस्वधी प्रयत्न मीत्र प्रदिप गाडेकर मार्फत केला.
तेवढ्यात तिथे दोन महिला मोठ्याने रडत आल्या.त्या आपल्या नशीबाला दोष देत होत्या. माझ्या लक्षात प्रकरण आलं.  मी काय झालं म्हणून त्याना विचारलं तर त्यांनी आमचे पैसे हरवले आहेत असे सांगितले. मी त्यांना मला पैसे सापडले आहेत. हरवलेले पैसे नेमके कुणाचे  आहेत याचाच मी शोध घेतो आहे असे त्यांना सांगितले. त्यांचे सांत्वन केले.दोन्ही महिलांनी माझ्यावर आशिर्वादाचा पाऊस पाडला. त्या माझ्या पाया पडू लागल्या. मी त्यांना नांव गांव विचारले तर त्यांनी  राधाबाई मापारे/मापारी मु.पो.अंधारी ता.सिल्लोड अशी माहिती दिली. हरवलेली रक्कम नेमकी किती आहे अशी विचारणा केली असता  ईस हजार कमी तीन लाख असं ग्रामीण ढंगाचे ऊत्तर मिळाले. नोटा कशा आहेत ह्याची विचारणा करून खातरजमा झाल्यावर सोबतच्या एका व्यक्तीच्या मदतीने पैसे मोजले तर ते दोन लाख ऐंशी हजार रुपये एवढे होते.ते त्यांना दिले.

    त्यांचा नवरा व मुलगा दोघेही कोरोना पॉझिटीव्ह होते. पुण्यात चाकणला कुठल्याशा कंपनीत काम करायचे. मोबाईल बंद होते. मिळेल त्या वाहनाने परत निघाले होते परंतु मधेच तब्येत खराब झाल्यामुळे औरंगाबादलाच दवाखान्यात दाखल झाले. वडील  व मुलगा कुठे  दाखल झाले आहेत हे या दोघींनाही व्यवस्थित माहित नव्हते. जवळचा सर्व अडका विकून दोघीही चाचपडत होत्या.  काल रात्री पासुन ऊपाशी होत्या सोबतच्या दशम्या संपल्या होत्या. मी त्यांना पोटभर नाष्टा करवून सोबत काही बिस्कीटचे पुडे दिले. राशन काही देता एईल का असा प्रयत्न नितीनजी बंगाळेना फोन करून पाहिला.
माझ्या जवळचे 3500/- रु.दिले व आजीबाईंचे आभाळभर आशिर्वाद मिळवले.

विजय ऊक्कलगांवकर
औरंगाबाद
सुपर फास्ट महाराष्ट्र न्यूज आमच्या पोर्टला व्हिसिट केल्याबद्दल आपले आभारी आहोत.जाहिरातीसाठी संपर्क करा.superfastmaharashtraa@gmail.com