भाजपा च्या प्रदेश उपाध्यक्षपदी मा. प्रा .राम शिंदे साहेब
*भाजपा च्या प्रदेश उपाध्यक्षपदी मा. प्रा .राम शिंदे साहेब*
कर्जत वार्ताहर
भारतीय जनता पार्टीच्या प्रदेश कार्यकारणीवर महाराष्ट्र राज्याचे माजी जलसंधारण मंत्री व अहमदनगर जिल्ह्याचे माजी पालकमंत्री मा. प्रा. रामजी शिंदे साहेब यांची प्रदेश उपाध्यक्षपदी वरिष्ठ पातळीवरून निवड करण्यात आली आहे. मा.प्रा. राम शिंदे साहेब यांनी आपल्या मंत्रिपदाच्या कार्यकाळात महाराष्ट्र राज्यात जलसंधारणाचं फार मोठं काम उभा केले होते . कुठल्याही कामात आपल्या कर्तुत्वाचा ठसा उमटवणार व्यक्तिमत्त्व म्हणून यांच्याकडे महाराष्ट्रातील जनता पाहते .कर्जत जामखेड मतदार संघामध्ये कित्येक वर्षाचा अनुशेष त्यांनी अल्पावधीत भरून काढलेला आहे. अशा प्रकारच्या व्यक्तिमत्त्वाला भारतीय जनता पार्टी तर्फे महत्वाची जबाबदारी देण्यात आली आहे . येणाऱ्या कालखंडात ते पक्षाच्या ध्येय धोरणानुसार निश्चित स्वरूपात पक्षासाठी उल्लेखनीय कामगिरीने महाराष्ट्रातील भारतीय जनता पार्टीला एका वेगळ्या उंचीवर नेण्याचं काम त्यांच्याकडून होऊ शकतं. या निवडीमुळे अहमदनगर जिल्हा भारतीय जनता पार्टीला नवसंजीवनी मिळालेली आहे . असी माहिती कर्जत तालुका भाजपा समन्वयक पप्पू शेठ धोदाड यांनी दिली. या निवडीचे महाराष्ट्रातील भारतीय जनता पार्टीच्या सर्व पदाधिकाऱ्यांनी हार्दिक अभिनंदन केले आहे.
त्याचबरोबर अहमदनगर जिल्हा भारतीय जनता पार्टीचे जिल्हाध्यक्ष अरुणजी मुंडे , भारतीय जनता पार्टीचे जिल्हा सरचिटणीस प्रसादजी ढोकरीकर,कर्जत नगरपंचायतचे कर्तव्यदक्ष नगराध्यक्ष नामदेव बापू राऊत, भारतीय जनता पार्टी चे जिल्ह्याचे नेते सचिन भैय्या पोटरे,जिल्हा परिषद सदस्य अशोकराव खेडकर, तालुका अध्यक्ष डॉ सुनिल गावडे, तालुका उपाध्यक्ष रामदास हजारे, कुंबेफळ ग्रामपंचायतीचे सरपंच काकासाहेब धांडे, भाजपा युवा मोर्चा प्रदेश उपाध्यक्ष विनोदजी दळवी,कर्जत-जामखेड सोशल मीडिया प्रसिद्धीप्रमुख गणेश पालवे,भाजपा युवा मोर्चा तालुका अध्यक्ष ज्ञानदेव लष्कर, वैद्यकीय आघाडीचे अध्यक्ष नंदलाल काळदाते ,तालुका किसान आघाडीचे अध्यक्ष राहुल निंबोरे, सरचिटणीस उमेश जेवरे, सुनील काळे, भारत मासाळ, भाजपाचे युवा नेते सुनिल काका यादव, हनुमंत गावडे, अतुल पोपट सुपेकर, यांच्यासह कर्जत तालुका भारतीय जनता पार्टीचे समन्वयक पप्पू शेठ धोदाड व इतर अनेक कर्जत तालुका भारतीय जनता पार्टीच्या पदाधिकाऱ्यांनी हार्दिक अभिनंदन केले आहे.
