सुपर फास्ट महाराष्ट्र न्यूज पोर्टल मध्ये आपले स्वागत आहे.जाहिरातीसाठी संपर्क करा.superfastmaharashtraa@gmail.com

पिशोर पोलिस स्टेशन येथे आज शांतता बैठक घेण्यात आली

पिशोर पोलीस ठाण्यात बुधवारी (ता.सहा) येत्या काही दिवसात साजरा होणाऱ्या मुस्लिम समाजाच्या ईद सणानिमित्त



आणि माननीय सर्वोच्च न्यायालयात श्रीराम जन्मभूमी संदर्भात निकाल देण्याच्या पार्श्वभूमीवर पोलीस ठाणे हद्दीतील सर्व गावातील पोलीस पाटील, तंटामुक्ती अध्यक्ष, शांतता समिती अध्यक्ष आणि मान्यवर नागरिक यांच्या उपस्थितीत बैठक पार पडली. उपविभागीय पोलीस अधिकारी जगदीश सातव यांच्या अध्यक्षतेखाली पार पडलेल्या या बैठकीत माजी सरपंच पुंडलिक डहाके, नारायण जाधव,पळशीचे सरपंच देविदास काळे, पिशोर तंटामुक्ती अध्यक्ष सूर्यकांत मोकासे, ग्रामपंचायत सदस्य एजाज पठाण,प्रा.डॉ.संजय गायकवाड, हद्दीतील सर्व पोलीस पाटील, मान्यवर नागरिक आणि पत्रकार यांची प्रमुख उपस्थिती होती. या वेळी


उपविभागीय पोलीस अधिकारी जगदीश सातव आणि सहाय्यक पोलीस निरीक्षक जगदीश पवार यांनी येत्या काही दिवसात अयोध्या येथील विवादित जमिनीचा निकाल कोणत्याही क्षणी येऊ शकतो. कोर्टाच्या दृष्टीने तो केवळ एका जागेचा निकाल आहे सदर निकाल कोणत्याही पक्षाचे बाजूने लागू शकतो तेव्हा जो काही निकाल येइल तो सर्वांनी मान्य करावा आणि आपल्या गावचे ,शहराचे शांतता व सौहार्दाचे वातावरण, जातीय सलोखा कायम राहील यासाठी पोलीस प्रशासनास सहकार्य करावे असे आवाहन केले. पोलीस प्रशासनाची करडी नजर प्रत्येक घडामोडीवर राहणार आहे विशेषतः युवकांवर पोलीस प्रशासनाचे विशेष लक्ष राहणार असून जर कोणी आपल्या गावाचे,शहराचे वातावरण दूषित करीत असल्याचे निदर्शनास आल्यास तात्काळ पोलिसांना कळवावे आणि शांतता राखावी अशा सुचना या प्रसंगी देण्यात आल्या.

सुपर फास्ट महाराष्ट्र न्यूज आमच्या पोर्टला व्हिसिट केल्याबद्दल आपले आभारी आहोत.जाहिरातीसाठी संपर्क करा.superfastmaharashtraa@gmail.com