सुपर फास्ट महाराष्ट्र न्यूज पोर्टल मध्ये आपले स्वागत आहे.जाहिरातीसाठी संपर्क करा.superfastmaharashtraa@gmail.com

जास्त पावसामुळे अजंता नदीला आजून ही पाणी

नाचनवेल(प्रतिनिधी विजय वैष्णव)

पावसाळ्यात जास्त  झालेल्या पावसामुळे अजंना नदिला अजुनही पाणी वाहत असून या वाहणाऱ्या पाण्यामुळे नाचनवेल - कोपरवेल या गावांच्या संपर्काला अडचण येत आहे.  अंजना नदीवरिल पुल तुटलेला असून त्यावरून रहदारी शक्य नाही. त्यामुळे  नाचनवेल-कोपरवेल वासी यांचा संपर्क तुटला आहे. या दोन गावांची मिळुन ग्रुप ग्राम पंचायत कार्यालय नाचनवेल येथे आहे .  या विषयी जिल्हाधिकारी उदय चौधरी यांनी येथे भेट दिली असता त्यांना  ही माहिती काही ग्रामस्थानी दिली आणि त्यांनी त्याचवेळी डायरीत नोंद करून घेतली. त्यामुळे ही पुलाची समस्या लवकरच मार्गी लागु शकेल अशी आशा ग्रामस्थाना आहे. अजंना नदीतुन जास्त पाणि वाहत असल्यामुळे अंत्ययात्रेसाठी ग्रामस्थाना मोठ्या समस्येचा सामना करावा लागत आहे. कारण स्मशानभुमी नदीच्या दुसर्‍या तिरावर आहे. त्यामुळे फक्त काहीजण पाण्यातुन पलिकडे अंत्ययात्रे सोबत जातात. येथे नवा मोठा पुल होणे गरजेचा आहे. तरच ही समस्या कायमची मार्गी लागेल. विजय वैष्णव 9423866969

सुपर फास्ट महाराष्ट्र न्यूज आमच्या पोर्टला व्हिसिट केल्याबद्दल आपले आभारी आहोत.जाहिरातीसाठी संपर्क करा.superfastmaharashtraa@gmail.com