सुपर फास्ट महाराष्ट्र न्यूज पोर्टल मध्ये आपले स्वागत आहे.जाहिरातीसाठी संपर्क करा.superfastmaharashtraa@gmail.com

आजच बहुमत सिद्ध करण्याचा आदेश द्या:--कपिल सिब्बल

*आजच बहुमत सिद्ध करण्याचा आदेश द्या; कपील सिब्बलांची न्यायालयात मागणी*

 वर्धा जिल्हा प्रतिनिधी: पवन चंबुलवार :-

देवेंद्र फडणवीस यांनी शनिवारी घेतलेल्या शपथविधीच्या विरोधात काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना हे तिन्ही पक्ष सर्वोच्च न्यायालयात गेले आहेत. त्यावर आज सुनावणी होत असून महाविकास आघाडीकडून कपील सिब्बल न्यायालयात बाजू मांडत आहेत. *अधिवेशन बोलावून विधानसभेत विश्वासदर्शक ठराव मांडाला जावा आणि भाजपला आजच बहुमत सिद्ध करण्याचा आदेश देण्यात यावा,  अशी मागणी कपील सिब्बल यांनी लावून धरली आहे. कुठल्याही प्रकारचं बहुमत नसताना शपथविधी कार्यक्रम पार पडला, असं सिब्बल म्हणाले आहेत.* *न्यायालयाचा भाजपला तुर्तास दिलासा* राज्यात सरकार स्थापनेबाबत महत्वाचा निर्णय, उद्या 10.30 वाजता कोणत्या आधारावर सरकार स्थापनेची परवानगी दिली ते कागदपत्रं न्यायालयात सादर करण्याचे कोर्टाचे आदेश, तुषार मेहता यांना आदेश दिला आहे.

 *_💁🏻‍♂ जाहीरातीसाठी संपर्क 8308375118*

सुपर फास्ट महाराष्ट्र न्यूज आमच्या पोर्टला व्हिसिट केल्याबद्दल आपले आभारी आहोत.जाहिरातीसाठी संपर्क करा.superfastmaharashtraa@gmail.com