खरीप पिकांच्या नुकसानीचे सर्वेक्षणसाठी धनोजे कुनबी समाज व सव॔ शाखीय कुनबी कडून जिल्हाधिकारी ना निवेदन
*धनोजे कुणबी समाज आणि सर्व शाखीय कुणबी समाजाच्या वतीने निवासी उपजिल्हाधिकारी भुगांवकर साहेबाना निवेदन*
दिनांक 7.11.2019ला मा. जिल्हाधिकारी साहेब यांना खरीप पिकाच्या झालेल्या नुकसानीचे सर्वेक्षण करुन सरसकट सर्वशेतकर्यांना हेक्टरी रु.50,000 /नुकसान भरपाई तात्काळ देण्यात यावी यासाठी आज धनोजे कुणबी समाज आणि सर्व शाखीय कुणबी समाजाच्या वतीने निवासी उपजिल्हाधिकारी श्री. भुगांवकर साहेबाना निवेदन देण्यात आले. निवेदन तात्काळ मुख्यमंत्री कार्यालयाला पाठविण्यात येईल असे त्यांनी आशवाशित केले. निवेदन देताना मंडाळाचे सल्लागार विनायकराव धोटे, प्रभाकर पारखी, अॅड. रमेश पिंपळशेंडे,झाडे कुणबी समाज अध्यक्ष तोरणे , बावणे कुणबी समाज अध्यक्ष लांजेवार , भुमिपुत्र संघटनेचे वसंता उमरे , वासुदेवराव बोबडे,गणपतराव हिंगाणे, डाॅ. गौरकार ,पावडे ,सतिश निब्रड , सौ. सुनिताताई धोटे यासह असंख्य कार्यकर्ते उपस्थित होते.