सुपर फास्ट महाराष्ट्र न्यूज पोर्टल मध्ये आपले स्वागत आहे.जाहिरातीसाठी संपर्क करा.superfastmaharashtraa@gmail.com

मुख्यमंत्री देवेंद्र फडनवीस :---राज्यपालांना भेटून निर्णय

मुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस:


मा. राज्यपाल श्री भगतसिंह कोश्यारी यांना भेटून आज महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा सादर केला. मा. राज्यपालांनी तो स्वीकारताना काळजीवाहू मुख्यमंत्री म्हणून मला पर्यायी व्यवस्था होईस्तोवर काम करण्यास सांगितले आहे. महाराष्ट्रातील जनतेचे मी मन:पूर्वक आभार व्यक्त करतो. मा. पंतप्रधान श्री नरेंद्र मोदीजी, आमचे राष्ट्रीय अध्यक्ष मा. अमित शाहजी, कार्यकारी अध्यक्ष जे.पी. नड्डाजी यांनी सुद्धा अतिशय भक्कम पाठिंबा दिला आणि आशीर्वाद आमच्या पाठिशी या 5 वर्षांत ठेवले. मी त्यांचाही मन:पूर्वक आभारी आहे. गेले 5 वर्ष महाराष्ट्राला अनंत अडचणींचा सामना करावा लागला. सातत्याने पडणारा दुष्काळ, कधी पूर तर कधी अवकाळी पाऊस. पण, यातही शेतकर्‍यांच्या पाठिशी खंबीरपणे उभे राहण्याचे काम राज्य सरकारने केले. इतिहासातील सर्वाधिक मदत शेतकर्‍यांना आम्ही दिली. जलयुक्त शिवार हे कायम माझ्या हृदयाच्या जवळ राहिले. राज्याला अनेक क्षेत्रात क्रमांक एकवर नेण्याचे काम आपल्या सरकारने केले. पायाभूत सुविधा, मेट्रो, ग्रामसडक, विमानतळ, रेल्वे प्रकल्प इत्यादी क्षेत्रात मोठे काम सरकारने केले. अनेक प्रलंबित प्रकल्प पुन्हा प्रत्यक्ष जमिनीवर साकारले गेले. राज्यातील जनतेला आमच्याकडून स्थिर सरकारची अपेक्षा आहे आणि तीच जनादेशाची सुद्धा मागणी आहे. ते सरकार लवकरच देण्याचे अभिवचन आपण देतो.

सुपर फास्ट महाराष्ट्र न्यूज आमच्या पोर्टला व्हिसिट केल्याबद्दल आपले आभारी आहोत.जाहिरातीसाठी संपर्क करा.superfastmaharashtraa@gmail.com