सुपर फास्ट महाराष्ट्र न्यूज पोर्टल मध्ये आपले स्वागत आहे.जाहिरातीसाठी संपर्क करा.superfastmaharashtraa@gmail.com

नवरचना विद्यालय पालक शिक्षक संघा कडून मुलांना भेट वस्तू वाटप

*नवरचना विद्यालय ( प्राथमिक ) पालक शिक्षक संघा तर्फे मुलांना भेट वस्तू वाटप*

नासिक प्रतिनिधी : प्रसाद पवार. नवरचना विद्यालय ( प्राथमिक ) पालक शिक्षक संघा तर्फे मुलांना भेटवस्तू वाटप करून नाविन्यपूर्ण असा उपक्रम राबवून साजरा करण्यात आला. पालक शिक्षक संघाच्या निधीतून 870 मुलांना रायटिंग पॅड वाटप करण्यात आले. मुलांना रायटिंग पॅड वाटप झाल्यानंतर मुलांच्या चेहऱ्यावरील आनंद बघून संस्थेचे उपाध्यक्ष व आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष श्री विजय डोंगरे सरांनी पालक शिक्षक संघाचे उपाध्यक्ष श्री शरद मंडलिक व कार्यकारणीचे कौतुक केले. प्रमुख पाहुण्यांचे तसेच कार्यकारनीचे स्वागत मुख्याध्यापिका सौ माया आचार्य मॅडम यांनी गुलाब पुष्प देऊन केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रस्तावना सौ. प्रीती चौधरी मॅडम यांनी केले. कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी रचना विद्यालयाचे शालेय व्यवस्थापन समितीचे उपाध्यक्ष श्री प्रमोद शिरोडे सरांचे मोलाचे सहकार्य लाभले. आभार प्रदर्शन पालक शिक्षक संघाच्या सचिव सौ. मनीषा शिंदे मॅडम यांनी मानले. कार्यक्रमास पालक शिक्षक संघातील सदस्य शिल्पा थोरात, प्रतिभा रणदिवे, गिरी मॅडम, विशाल जाधव, राजू शेटाने, मधुकर जगताप आणि सर्व शिक्षक वृंद तसेच माध्यमिक विभागाचे श्री पंकज पवार सर उपस्थित होते.

सुपर फास्ट महाराष्ट्र न्यूज आमच्या पोर्टला व्हिसिट केल्याबद्दल आपले आभारी आहोत.जाहिरातीसाठी संपर्क करा.superfastmaharashtraa@gmail.com