जिल्हा परिषद केंद्रीय प्राथमिक शाळा गाजगाव येथे 70वा संविधान दिवस साजरा
आज दिनांक 26/ 11 /2019 रोजी जिल्हा परिषद केंद्रीय प्राथमिक शाळा गाजगाव येथे 70वा संविधान दिन साजरा करण्यात आला. सर्वप्रथम गावातून मुलांची प्रभात फेरी काढण्यात आली. मुलांनी संविधानाचे मोठ्याने वाचन केले
.सर्वांना संविधानाची शपथ देण्यात आली. संविधाना विषयी घोषवाक्य मुलांना सांगण्यात आले .याप्रसंगी गावातील प्रतिष्ठित व्यक्ती उपस्थित होते. त्यामध्ये आदरणीय श्री .कडुबा अण्णा हिवाळे माजी जिल्हा परिषद सदस्य तसेच श्री .विठ्ठल आण्णा थोरात सरपंचपती ,शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष श्री. गुलाब शाह, श्री. शिरसाठ काका, श्री. धुमाळ साहेब सेवानिवृत्त पोलीस उपनिरीक्षक श्री. उबाळे साहेब ग्रामविकास अधिकारी गाजगाव, श्री. बाबू भाई शेख तसेच ग्रामस्थ उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्तविक गाजगाव केंद्राचे केंद्रप्रमुख आदरणीय श्री अंकुश पाटील जाधव यांनी केले तसेच मान्यवरांचे आभार शाळेचे मुख्याध्यापक आदरणीय श्री. बडोगे के. एम यांनी मानले .याप्रसंगी शाळेतील सर्व शिक्षक वृंद उपस्थित होते.