*आर . टी . आय कंप्यूटर अँड टेक्निकल इन्स्टिट्यूट वड्णेर येथे जिवन विकास कौशल्य शिक्षण शिबिर प्रसंगी विद्यार्थी संवाद कार्यक्रमाचे आयोजन*
*राहुल दूरतकर , तालुका प्रतिनिधी हिंगणघाट*

स्थानीय वड्णेर येथील आर . टी . आय कंप्यूटर अँड टेक्निकल इन्स्टिट्यूट येथे नेहरू युवा केंद्र वर्धा , युवा कार्यक्रम व खेळ मंत्रालय भारत सरकार यांच्या संयुक्त विद्यमाने सात दिवशीय जिवन विकास कौशल्य शिक्षण शिबिराचे आयोजन 13 ते 18 वयोगटातील विद्यार्थ्यांकरिता करण्यात आला . सर्वप्रथम स्वामी विवेकानंद यांच्या प्रतीमीचे पूजन करून कार्यक्रमास सुरुवात करण्यात आली .याप्रसंगी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी विद्यार्थी प्रतिनिधी कु . मनिषा वांढरे , प्रमुख मार्गदर्शक म्हणून विद्यार्थ्यांनी कु . आचल तागडे, कु . वैष्णवी तिजारे , कु . प्रतीक्षा इंगोले , प्रमुख उपस्थिती म्हणून विद्यार्थ्यांनी कु . गायत्री ऊगेमुगे , कु . संजना पाटील , आयोजक म्हणून वर्ग 9 च्या विद्यार्थ्यांनी कु . जयश्री वांढरे , ममता बावणे , नंदिनी चिंचोळकर , स्न्हेहा शेंद्रे , शिवानी ची मंच्यावर उपस्थिती होती . यावेळी स्वागत गीत कु . संजना पाटील व शिवानी तिजारे यांनी सादर केले . 13 ते 18 या वयोगटातील मुला - मुली मध्ये या वयात योग्य ते बदल होत असतात म्हणून या वयात योग्य मार्गदर्शन मिळावे म्हणून या जिवन कौशल्य कार्यकर्माचे आयोजन सात दिवसा करिता करण्यात आले . असून यामध्ये विद्यार्थीना सात दिवस मार्गदर्शन करण्यात आले आहेत. असे मत आपल्या प्रास्ताविक भाषणातून संस्थेचे अध्यक्ष राहुल दूरतकर यांनी व्यक्त केले . जिवन जगत असताना विद्यार्थ्यांनी समस्या चा प्रतिकार करून जिवन जगावे असे विद्यार्थिनी कु .आचल तागडे हिने व्यक्त केले . विद्यार्थ्यांनी स्वतःच्या सर्वांगीण विकास करून आपल्या कौशल्याच्या आधारे राष्ट्र सेवा आणि समाज सेवा करावी असे मत कु . वैष्णवी तीजारे हिने व्यक्त केले . विद्यार्थ्यांनी स्रुजनशील पणे स्वतःचा विकास कसा करावा ह्या सर्व गोष्टी या कार्यक्रमाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना आत्मसात करता आल्या मत आपल्या अध्यक्षिय भाषणातून विद्यार्थ्यांनी प्रतिनिधी कु . मनिषा वांढरे हिने व्यक्त केले . या सात दिवसात एकून 40 विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवून जिवन कौशल्य शिक्षण याविषयी चर्चा घडून आणल्या . याप्रसंगी उपस्थित युवा प्रेरणा विद्यार्थी सेवा संस्थेचे अध्यक्ष राहुल दूरतकर, कार्यक्रम अधिकारी विकास तीजारे, नेहरू युवा केंद्राचे स्वयंसेवक सचिन महाजन , शिक्षिका सौ . कल्याणी उरकुडे , कु . विभा गुरनुले , कु . राखी जाधव आणि विद्यार्थ्यांची मोठया प्रमाणात उपस्थिती होती . यावेळी संचालन आणि आभारप्रदर्शन शिक्षिका कु . कल्याणी उरकुडे यांनी केले . *राहुल दूरतकर , तालुका प्रतिनिधी हिंगणघाट 9923937033*