सुपर फास्ट महाराष्ट्र न्यूज पोर्टल मध्ये आपले स्वागत आहे.जाहिरातीसाठी संपर्क करा.superfastmaharashtraa@gmail.com

वड्णेर येथील पेट्रोल पंप एक वर्षापासून बंद:--नागरिकांना आतोनात त्रास

*वड्णेर येथील पेट्रोल पंम्प एक वर्षापासून बंद*

 *एक वर्षांपासून नागरिकांना अतोनात त्रास*


 *राहुल दूरतकर , प्रतिनिधी हिंगणघाट 9923937033*

 स्थानीय हिंगणघाट तालुक्यातील वड्णेर येथील राष्ट्रीय महामार्ग क्रमांक सात वरिल पेट्रोल पंम्प मागील एक वर्षा पासून बँक ऑफ वड्णेर या बँकेने सील लावल्यामुळे बंद असून यामुळे ग्रामिण भागातील व वड्णेर परिसरातील नागरिकांना एक वर्षांपासून पेट्रोल भरायचे कुठे हा अतोनात त्रास सहन करावा लागत आहेत . एखाद्या वेळी रुग्णांना दवाखान्यात न्यायचे असेल गाडीत पेट्रोल नसल्याकरानामुळे रुग्णास न्यायचे कसे हा मोठा प्रश्न वड्णेर परिसरातील नागरिकांन समोर आहेत . एक वर्षांपासून स्थानीय आमदारानी याकडे लक्ष दिले नाही . आता निवडणुकी झाल्या पुन्हा समीर कुणावर यांना लोकांनी मोठया मतांनी निवडून दिले . पण आता तरी आमदार साहेब आणि इतर पदाधिकारी या कडे लक्ष देईल का नाही . हा प्रश्न नागरिकांसमोर आहेत .वड्णेर हे गाव राष्ट्रीय महामार्ग क्रमांक सात वर असल्यामुळे वड्णेर जवळ पास कुठेही पेट्रोल पंम्प नाही . त्यामुळे याचा त्रास सर्व च नागरिकांना सहन करावा लागत असल्यामुळे आता तरी सरकार याकडे लक्ष देईल अशी अश्या व्यक्त केली आहेत

 *राहुल दूरतकर , प्रतिनिधी हिंगणघाट 9923937033*

सुपर फास्ट महाराष्ट्र न्यूज आमच्या पोर्टला व्हिसिट केल्याबद्दल आपले आभारी आहोत.जाहिरातीसाठी संपर्क करा.superfastmaharashtraa@gmail.com