जिल्हा मध्यवर्ती बँकेचे संचालक तथा जिल्हा कॉंग्रेस चे सरचिटणीस श्री किरण पाटील डोणगावकर याच्या वाढदिवसा निमित्त शालेय व्यवस्थापन समिती चे अध्यक्ष श्री गुलाब शाह यांनी स्वतच्या खर्चातून शालेय साहित्य वाटप
आज दिनांक 25/ 11 /2019 रोजी जिल्हा परिषद केंद्रीय प्राथमिक शाळा गाजगाव याठिकाणी जिल्हा मध्यवर्ती बँकेचे संचालक तथा जिल्हा काँग्रेसचे सरचिटणीस आदरणीय श्री. किरण पाटील डोणगावकर यांच्या वाढदिवसा निमित्ताने शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष

आदरणीय श्री .गुलाब शाह यांनी स्वतःच्या खर्चातून 285 विद्यार्थ्यांना वह्या व पेनचे वाटप केले. तसेच आज शालेय परिपाठामध्ये आज वाढदिवस असणाऱ्या मुली कु. वैष्णवी मढिकर इयत्ता -5वी कु. निकिता कांबळे इयत्ता-5वी तसेच कु. सना मेहताब शाह इयत्ता 6वी या मुलींचा वाढदिवस केक कापून साजरा करण्यात आला .वरील उपक्रम त्यांच्या वर्गशिक्षिका श्रीमती.आंधळे एच.ई यांनी साजरा केला याप्रसंगी शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष आदरणीय श्री .गुलाब शाह यांनी विद्यार्थ्यांना श्री. किरण पाटील डोणगावकर यांच्या वाढदिवसानिमित्त मार्गदर्शन केले. याप्रसंगी कार्यक्रमाचे प्रस्ताविक शाळेचे मुख्याध्यापक आदरणीय श्री. बडोगे. के .एम यांनी केले . याप्रसंगी शालेय व्यवस्थापन समितीचे माजी उपाध्यक्ष तथा विद्यमान सदस्य श्री. पोपट भाऊ गवळी तसेच गावातील प्रतिष्ठित नागरिक श्री. रऊफ शेख श्री .विशाल लांडगे श्री. हबीब शेख श्री. बाबुभाई शेख श्री. योगेश शिंदे श्री .आजम शेख श्री. कलीम पैलवान गोळेगावकर श्री .गोरखनाथ जाधव इत्यादी मान्यवर उपस्थित होते. शेवटी सर्व मान्यवरांचे शाळेतील शिक्षक श्री .भगवान अहिरराव यांनी आभार मानले याप्रसंगी श्री .अंकुश पाटील जाधव, श्री. कल्याण डमाळे, श्रीम. वंदना ठोळे श्रीम .मिनाक्षी काथार, श्रीम. सविता थोरात, श्रीम. मनिषा रुपनर श्रीम. स्मिता पुल्लेवार इत्यादी शिक्षक उपस्थित होते. Aurangabadप्रतिनिधी अनिरुद्ध भारद्वाज मो,9890557747