सुपर फास्ट महाराष्ट्र न्यूज पोर्टल मध्ये आपले स्वागत आहे.जाहिरातीसाठी संपर्क करा.superfastmaharashtraa@gmail.com

वर्धा येथे वादविवाद स्पर्धेचे आयोजन

*पोलीस अधीक्षक कार्यालय वर्धाद्वारे*

 वर्धा जिल्हा प्रतिनिधी: पवन चंबुलवार :-

वादविवाद स्पर्धेचे आयोजन करण्यात आले असल्याबाबत. दिनांक 28/11/2019 रोजी वर्धा जिल्हा दलाचे वतीने रेजिंग डे निमीत्त महिलांसाठी सुरक्षित वातावरण तयार करणे करीता कठोर कायदा (नियम) ऐवजी सामाजिक बदल आवश्यक आहेत किंवा कसे या विषयावर वादविवाद स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते सदर कार्यक्रम मा. पोलीस अधीक्षक, अपर पोलीस अधीक्षक यांचे अध्यक्षतेखाली सावित्रीबाई फुले यांचे प्रतिमेला हार अर्पण करुन कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. कार्यक्रमाचे प्रास्ताविक सपोनि मेघाली गावंडे, महिला सुरक्षा विशेष कक्ष (भरोसा सेल). यांनी केले तर सुत्रसंचालन सौ अंजली तिनघसे केसरीमल कन्या शाळा, वर्धा यांनी केले. कार्यक्रमाला वर्धा जिल्हयातील 10 विद्यालयामधून एकूण 30 विद्याथ्र्यानी सहभाग नोंदविला होता. तसेच चेतना डी.एड. काॅलेजच्या प्राचार्य डाॅ. संगिता धनाढय, कुंभलकर काॅलेज आॅफ सोशल वर्कचे प्राध्यापक श्री रामेश्वर व्हंडकर, यशवंत महाविद्यालया





चे प्राध्यापक श्री प्रमोद नारायणे तसेच जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाच्या अॅड सारिका डंभे यांनी कार्यक्रमास परिक्षक म्हणून काम पाहिले. घेण्यात आलेल्या वादविवाद स्पर्धेमध्ये विषयाचे बाजूने मतमांडणी जी.एस.काॅमर्स काॅलेज, वर्धा येथील विद्यार्थी पुजा बोदड हिने प्रथम क्रमांक पटकाविला असून श्रेया ठाकरे जे.बी.सायन्स काॅलेज, वर्धा हिने द्वितीय क्रमांक पटकाविला आहे. तसेच विषयाचे विरुध्द बाजूने मतमांडणी करणारे जी.एस. काॅमर्स काॅलेज, वर्धा येथील संजना टिकले हिने प्रथम क्रमांक पटकाविला असून त्याच काॅलेजची विद्यार्थी ताषू धवाणी हिने द्वितीय क्रमांक पटकाविला आहे.



 प्रथम व द्वितीय क्रमांक आलेल्या विद्यार्थीना मा. अपर पोलीस अधीक्षक, वर्धा यांचे हस्ते प्रमाणपत्र व पुष्पगुच्छ देवून गौरविण्यात आले. सदर वादविवाद स्पर्धेमध्ये प्राविण्य प्राप्त विद्याथ्र्याचे दोन टिम तयार करुन नागपूर परिक्षेत्र स्तरावर होणा-या वादविवाद स्पर्धेकरीता निवड करण्यात आलेली आहे. सदर कार्यक्रमास मा. पोलीस अधीक्षक, वर्धा डाॅ. श्री बसवराज तेली, मा. अपर पोलीस अधीक्षक, वर्धा श्री निलेश मोरे, मा. पोलीस उपअधीक्षक (गुह), वर्धा श्री निलेश ब्राम्हणे, मा. राखीव पोलीस निरीक्षक श्री शालीक उईके, मा. सहा. पोलीस निरीक्षक श्रीमती मेघाली गावंडे तसेच 250 ते 300 विद्यार्थी, शिक्षक व वर्धा जिल्हा पोलीस दलातील पोलीस अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते. सदर कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन परि. पोलीस उपनिरीक्षक केकन यांनी केले. कार्यक्रमास यशस्वीरित्या पर पाडणे करीता महिला सुरक्षा विशेष कक्ष (भरोसा सेल) येथील मसफौ अणू राउत, सविता मुडे मपोहवा सत्यभामा लोणारे, महिला सहाय कक्षाचे सुनिता झामरे व दामिणी पथकाच्या मपोहवा मिना कोहळे, निलू खानजोडे यांनी सहकार्य केले.

सुपर फास्ट महाराष्ट्र न्यूज आमच्या पोर्टला व्हिसिट केल्याबद्दल आपले आभारी आहोत.जाहिरातीसाठी संपर्क करा.superfastmaharashtraa@gmail.com