सुपर फास्ट महाराष्ट्र न्यूज पोर्टल मध्ये आपले स्वागत आहे.जाहिरातीसाठी संपर्क करा.superfastmaharashtraa@gmail.com

संपूर्ण महाराष्ट्रात परतीच्या पावसाने झालेले नुकसान भरपाई तसेच तातडीची मदत व सव॔ शेतकर्या चा सात बारा कोरा करून द्यावा आसे निवेदन

*संपूर्ण महाराष्ट्रामध्ये परतीचा पाऊस आणि सतत झालेल्या अतिवृष्टीच्या नुकसानाला तातडीने मदत आणि संपूर्ण सातबारा कोरा करण्यात यावा .



असे निवेदन मा . तालुका उपविभागीय व दंडाधिकारी यांच्या मार्फत मा . राज्यपालांना निवेदन देन्यात आले .* *तालुका प्रतिनिधी राहुल दूरतकर* स्थानीय वड्णेर परिसरातील सुशिक्षित युवा शेतकरी व मित्र परिवार तालुका हिंगणघाट यांच्या माध्यमातून माननीय राज्यपालांना शेतीच्या झालेल्या नुकसानभरपाई करिता आज निवेदन देण्यात आले .

 सध्या महाराष्ट्रामध्ये प्रचंड सतत पाऊसामुळे शेतकऱ्यांचे खरीब व रब्बी अश्या दोन्ही हंगामातील पिकांचे मोठया प्रमाणात नुकसान झाले आहेत . लागवडीला लागलेला खर्च होऊन सुध्दा येनार पिक हातातून निघून गेल्यामुळे शेतकरी हा मोठया संकटात सापडला आहे . त्यामुळे शेतकरी आता कर्जबाजारी झाल्यामुळे व बँक कर्मचारी व वसूल अधिकारी वर्गा कडुन कर्ज वसुल करण्यात होणाऱ्या अन्याय अत्याचारा मुळे त्यांच्या वर प्रचंड ताणतणावाचे वातावरण असल्यामुळे प्रचंड आत्महत्येचे प्रमाण वाढले आहेत . यामुळे सध्या राज्यात राजकीय घडामोडीमुळे शेतकरी चिंतेत असल्यामुळे कोरडवाहू पिकाकरिता हेक्टरी 25 हजार तर फळ व इतर रब्बी पिकाकरिता हेक्टरी 50 हजार रुपये जाहीर करून पिक विम्याची रक्कम तातडीने शेतकऱ्याना देऊन दिलासा द्यावा तसेंच शेतकऱ्याचा संपूर्ण सात बारा कोरा करावा याकरिता आज मा . तालुका उपविभागीय अधिकारी साहेब यांच्या मार्फत सन्माननीय राज्यपाल साहेबां पाठविण्यात आले . निवेदन देते वेळी वडणेर परिसरातील युवा शेतकरी राहुल दूरतकर , विकास तिजारे , संदीप सुपटकर , निलय धर्माधिकारी , सचिन कामडी , पवन झोटिंग , आशिष ढगे , आशिष लोणबले , आदीची उपस्थिती होती .

*तालुका प्रतिनिधी राहुल दूरतकर 9923937033*

सुपर फास्ट महाराष्ट्र न्यूज आमच्या पोर्टला व्हिसिट केल्याबद्दल आपले आभारी आहोत.जाहिरातीसाठी संपर्क करा.superfastmaharashtraa@gmail.com