अखिल भारतीय तिरंदाजी
*अखिल भारतीय तिरंदाजी*
वर्धा जिल्हा प्रतिनिधी: पवन चंबुलवार :- स्पर्धेत वर्धा जिल्हयातील महिला पोलीस कर्मचारी यांना सुवर्ण पदक. दिनांक 18 नोव्हेंबर 2019 ते 23 नोव्हेंबर 2019 दरम्यान पष्चिम बंगाल येथील सिलीगुडी येथे 8 वी अखिल भारतीय तिरंदाजी स्पर्धा आयोजीत करण्यात आली होती

. सदर स्पर्धेमध्ये वर्धा जिल्हयातील महिला पोलीस काॅन्स्टेबल सिमा दुबे हिने तिरंदाजी प्रकारामध्ये सुवर्ण पदक पटकावले असुन वर्धा जिल्हा पोलीस दलाचे नाव लौकीक केले आहे. सिमा दुबे ही कबड्डी या खेळाची उत्कृश्ट खेळाडु असुन महाराश्ट्र पोलीस संघाचे राज्यस्तरावर सुद्धा प्रतिनिधत्व केलेले आहे. सिमा दुबे ही सन 2013 मध्ये वर्धा जिल्हा पोलीस दलामध्ये भरती झाली असुन सध्या पोलीस स्टेषन पुलगाव येथे नेमणुकीस आहे. महिला पोलीस षिपाई सिमा दुबे यांचा मा. पोलीस अधीक्षक डाॅ. श्री. बसवराज तेली यांचे हस्ते षाल व श्रीफळ देवून सत्कार करण्यात आला व पुढे सुद्धा अषीच उत्कृश्ट कामगिरी करावी याबद्दल त्यांना षुभेच्छा देण्यात आल्या.सुर्वण पदक प्राप्त खेळाडु हिने त्याचे यषाचे श्रेय मार्गदर्षक व प्रषिक्षकांसह पोलीस अधीक्षक डाॅ. श्री. बसवराज तेली व अपर पोलीस अधीक्षक श्री निलेष मोरे यांना दिले आहे. सदर समारंभाचे वेळी पोलीस उपअधीक्षक (गृह) श्री निलेष ब्राम्हणे, राखीव पोलीस निरीक्षक श्री एस.एस. उईके, खेळ प्रमुख सफौ. दिलीप थाटे तसेच पोलीस कर्मचारी उपस्थीत होते.