सुपर फास्ट महाराष्ट्र न्यूज पोर्टल मध्ये आपले स्वागत आहे.जाहिरातीसाठी संपर्क करा.superfastmaharashtraa@gmail.com

नाचनवेल ते चौफुली रस्त्याची दुरावस्था

नाचनवेल(प्रतिनिधी) विजय वैष्णव बसस्थानक ते चौफुली या दीड किलोमीटर रस्त्याची अत्यंत दयनीय अवस्था झाली



 असून रस्त्यावर मोठ-मोठे खड्डे पडल्याने वाहनधारक त्रस्त झाले आहे. नाचनवेल हे मोठे बाजारपेठेचे गाव असून येथे वाहनांची मोठी वर्दळ असते. मोठमोठे खड्डे चुकवताना येथे अपघाताचे प्रमाण वाढले आहे. कन्नड सिल्लोड राज्य रस्त्यापासून चौफुली ते बसस्थानक हे दीड किलोमीटरचे अंतर आहे. या रस्त्यावरून कन्नड, सिल्लोड व औरंगाबाद आगाराच्या बसेस दिवसभरातून पंचवीस ते तीस फेऱ्या रोज करतात. पण रस्ता खराब असल्यामुळे बसेस बसस्थानकावर येण्यास टाळाटाळ करतात यामुळे शाळकरी मुले मुली वयोवृद्ध नागरिक यांना दीड किलोमीटरची पायपीट करावी लागत आहे. याच रस्त्यावर खानदेशाला जोडणारा जवळचा मार्ग असून वाकी, नेवपूर,शेलगाव ही प्रसिद्ध देवस्थाने आहे. रस्त्यात खड्डे की खड्ड्यात रस्ता हे समजायला मार्गच नाही. सध्या परतीच्या पावसाने थैमान घातले असून खड्ड्यात पाणीच पाणी साचलेले आहे. नवीन वाहन चालकांना या खड्ड्यांचा अंदाज येत नसल्याने अपघाताचे प्रमाण वाढले आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाने या रस्त्यावर त्वरित काम सुरू करावे अशी मागणी वाहन धारकामधून केली जात आहे. प्रतिनीधी विजय वैष्णव 9423866969 (फोटो आहे)

सुपर फास्ट महाराष्ट्र न्यूज आमच्या पोर्टला व्हिसिट केल्याबद्दल आपले आभारी आहोत.जाहिरातीसाठी संपर्क करा.superfastmaharashtraa@gmail.com