सुपर फास्ट महाराष्ट्र न्यूज पोर्टल मध्ये आपले स्वागत आहे.जाहिरातीसाठी संपर्क करा.superfastmaharashtraa@gmail.com

त्र्यंबकेश्वर येथे 12नोव्हेंबर ला रथोत्सवाचे आयोजन

12 नोव्हेंबरला रथोत्सव मंगळवारी

 भात बळी दि 10 ला वैकुंठी महापूजा देव दिवाळीची सांगता त्र्यंबकेश्वर नगरी सज्ज 50हजार भाविक येणार त्र्यंबकेश्वर दि 6 नोव्हेंबर 2019 त्र्यंबकेश्वर नगरीतील वैभवशाली उत्सव म्हणजे त्रिपुरी पौर्णिमा रथोत्सव भगवान शंकरानी त्रिपुरासुर नामक दैत्याचा वध केला त्याचा आनंद म्हणून त्रिपुरी पौर्णिमा रथोत्सव साजरा करण्याची परंपरा आहे यंदा दि 12 नोव्हेंबर रोजी मंगळवारी रथोत्सव त्रिपुरी पौर्णिमा आहे देव दिवाळीची सांगता या दिवशी होते त्र्यंबकेश्वर देवस्थान ट्रस्ट कडून या उत्सवाची जय्यत तयारी सुरू आहे ट्रस्टचे अध्यक्ष न्या.एम.एस बोधनकर व सहकारी कार्यरत आहे145 वर्षा पूर्वी पेशव्याचे सरकार विंचूरकर यांनी त्र्यंबकेश्वराच्या चरणी अर्पण केलेला 30 फूट उंचीचा कलात्मक रथ या दिवशी मिरवला जातो यात त्र्यंबकेश्वराची सोन्याची पंचमुखी मूर्ती या रथातून मिरवली जाईल दुपारी 4 ते 6 या वेळेत रथ मिरणूक पालखी सोहळा होईल सजवलेला व आकर्षक विद्युत रोषणाई केलेला रथ बैलाच्या पाच जोड्या ओढीतील त्र्यंबकेश्वराचे सार्थ्य साक्षात ब्रम्हदेव करतात या श्रद्धेने ब्रम्हदेवाची मूर्ती सार्थ्य करते तेथे असते त्र्यंबकेश्वर मंदिरात रात्री 8 वाजता दगडी दीपमाळ प्रज्वलित करणेत येईल महिला भाविक कार्तिक वाती प्रज्वलित करतात सर्व उत्सव साठी मंदिर यंत्रणा कर्मचारी वर्ग तुंगार ट्रस्ट पुरोहित संघ यांचे मर्गदर्शन लाभते देवस्थांकडून गंधअक्षद बैठक असते दि 10 रोजी रविवारी रोजी मध्य रात्री हरीहर भेट होईल त्र्यंबकेश्वर मंदिरात ब्रम्हा विष्णू महेश या देवतेचा वास असून वैकुंठ चतुर्दशी म्हणजे ब्रम्हा विष्णू पूजन होय त्या मुळे रात्री दीड वाजे पर्यंत त्र्यंबकेश्वर मंदिर खुले उघडे राहील दरम्यान मंगळवारी दुपारी येथे ग्राम देवता महादेवीस भात बळी अर्पण केला जाईल गावकऱ्यांनी जमवलेला तांदूळ कुशावर्तावर गोदावरी जलाने शिजवला जातो मिरवणुकीने देवीस अर्पण केला जातो प्रसंगी बैल अथवा रेडा ही गाडी ओढतो देशातील रोग राई नष्ट व्हावी या साठी तसेच जीव हत्त्या टाळावी या साठी तांत्रिक वनस्पती कोहळा कापून देवीस भात बळी वैदिकाच्या मंत्र घोषत दिला जातो सकाळी 11 ते एकच्या दरम्यान भात बळी कार्यक्रम होईल वरील सर्व उत्सव गाव पातळीवर सर्व भाविक नागरिक एकत्र येत करतात कार्यकर्ते मानकरी यांचा सहभाग असतो या मंदिराशी पूजेशी संबंधित कार्यरत असतात त्र्यंबकेश्वर मधील मंडळे मिरवणूक मार्गावर रांगोळ्या काढून तसेच पुष्पवृष्टी करून रथोत्सवात रंग भारतात त्र्यंबकेश्वर नगरपालिका स्वछतेवर भर देते पोलीस बंदोबस्त असतो 50 हजार भाविक उपस्थित राहतील असा अंदाज आहे

प्रतिनिधी वैशाली मोरे त्रिंबकेश्वर तालुका

सुपर फास्ट महाराष्ट्र न्यूज आमच्या पोर्टला व्हिसिट केल्याबद्दल आपले आभारी आहोत.जाहिरातीसाठी संपर्क करा.superfastmaharashtraa@gmail.com