विजय स्पर्धा परीक्षा केंद्र लातूर येथे आदर्श व्यक्तिमत्व गंगाधर पवार यांचा सत्कार
प्रतिनिधी लातूर
विविध क्षेत्रात विशेष कामगिरी करणाऱ्या कार्यकर्त्यांना शोधून त्यांच्या कार्याचा गौरव करून त्यांचा सन्मान करण्याचे काम ए आय एस एफ वैद्यकीय समितीच्या माध्यमातून करण्यात येते. सन २०२२ मधील पुरस्कार नुकतेच प्रदान करण्यात आले असून पुण्य नगरीचे गंगाधर पवार यांना यावर्षीचा आदर्श सामाजिक कार्यकर्ता पुरस्कार प्रदान करण्यात आला .
खुलताबाद येथे पार पडलेल्या पुरस्कार वितरण अध्यक्षस्थानी राष्ट्रपती पुरस्कार प्राप्त आशाताई गजरे या होत्या तर प्रमुख पाहुणे म्हणून सुधाकर शिंदे हे होते. यावेळी एआयएसएफ वैद्यकीय समितीचे डॉक्टर अमोल जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली या सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये लेखक, पत्रकार, आरोग्य कर्मचारी , डॉक्टर, समाजसेवक, आदर्श व्यक्तिमत्व अशा व्यक्तीचा समावेश होता.
यामध्ये गंगाधर पवार यांनी वृक्ष लागवड, रक्तदान चळवळ विविध सामाजिक संस्थेच्या माध्यमातून अनेक गरजूंना मदत केली व जिथे अन्याय होईल त्या अन्यायाला वाचा फोडण्याचे काम गंगाधर पवार यांनी केले. यामध्ये खाजगी संस्था, निकृष्ट दर्जाचे काम हे विषय हाती घेऊन मार्गी लावले. शिक्षण क्षेत्रामध्ये विद्यार्थी व शिक्षकांना न्याय मिळवून देण्याचे काम केले.या पुरस्काराबद्दल पवार यांचे सर्वस्तरातून अभिनंदन होत आहे .
लातूर येथील नामांकित बारगिरे सर संचालित विजय स्पर्धा परीक्षा केंद्र येथे भव्य सत्कार व मार्गदर्शनाचे आयोजन करण्यात आले होते.
यावेळी अकॅडमी चे संचालक श्री दत्ता बारगिरे सर ,श्री चलवाड सर,आमचे मित्र श्री सुहास पाटील सर व संपूर्ण विद्यार्थी वर्ग उपस्थित होता.