सुपर फास्ट महाराष्ट्र न्यूज पोर्टल मध्ये आपले स्वागत आहे.जाहिरातीसाठी संपर्क करा.superfastmaharashtraa@gmail.com

हिंगोली सार्वजनिक शिवजयंती महोत्सव समितीचे कार्यकर्ते कल्याण देशमुख व दिलीप घ्यार यांचा कमलानगर येथील महिलांच्यावतीने सत्कार ..

हिंगोली    सार्वजनिक शिवजयंती महोत्सव समितीचे  कार्यकर्ते कल्याण देशमुख व दिलीप घ्यार यांचा  कमलानगर येथील महिलांच्यावतीने सत्कार  ..

हिंगोली (प्रतिनिधी)- कमलानगर येथील महिला मंडळाच्या वतीने सार्वजनिक शिवजयंती महोत्सव समितीचे सक्रीय कार्यकर्ते कल्याण देशमुख व दिलीप घ्यार यांचा सत्कार करण्यात आला. 

बुधवार दि.२ मार्च रोजी कमला नगर येथील भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर सभागृहात सार्वजनिक शिवजयंती महोत्सव सर्वांना सोबत घेऊन भव्य स्वरुपात साजरा करण्यात आला. याबद्दल शिवजन्मोत्सव समितीचे सक्रीय कार्यकर्ते कल्याण देशमुख व दिलीप घ्यार यांचा महिला मंडळाच्या वतीने।  दोघे उत्कृष्ट कार्य करत असल्यामुळे त्यांनचा   छत्रपती शिवाजी महाराज यांची प्रतिमा भेट देऊन सत्कार करण्यात आला. 
यावेळी माजी नगराध्यक्षा अनिताताई सुर्यतळ, माजी नगरसेवक सदाशिव सुर्यतळ, प्रभाताई चाटसे, सुवर्णाताई चाटसे, सुजाताताई चाटसे, आशाताई भगत, दिपके ताई, कविताताई वाठोरे, अर्चनाताई वाकळे, ताई भालेराव, अरुण भालेराव, राजेंद्र रणवीर, संभाजी ढगे यांच्यासह महिला व पुरुष मोठया संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन राजेंद्र रणवीर तर आभार प्रदर्शन माजी नगराध्यक्ष अनिताताई सुर्यतळ यांनी व्यक्त केले.
सुपर फास्ट महाराष्ट्र न्यूज आमच्या पोर्टला व्हिसिट केल्याबद्दल आपले आभारी आहोत.जाहिरातीसाठी संपर्क करा.superfastmaharashtraa@gmail.com