सुपर फास्ट महाराष्ट्र न्यूज पोर्टल मध्ये आपले स्वागत आहे.जाहिरातीसाठी संपर्क करा.superfastmaharashtraa@gmail.com

*डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे विचार आणि कार्याचा वारसा पुढे चालवू* -प्रा॰ मीनाक्षी बोंडगे

*डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे विचार आणि कार्याचा वारसा पुढे चालवू* 
-प्रा॰ मीनाक्षी बोंडगे
*खुशीग्राम निवासी प्रकल्पास ग्रंथदान व अन्नदान* 
============================
ग्रंथ हेच गुरु आणि शिक्षण हे वाघिणीचे दूध असे समजणारे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त खुशी फाऊंडेशन द्वारा संचलित खुशीग्राम निवासी प्रकल्पास ग्रंथ भेट देण्यात आले. समाजातील वंचित, उपेक्षित, निराधार आणि आत्महत्याग्रस्त शेतकर्‍यांची १० मुले खुशीग्राम निवासी प्रकल्पात राहतात. सामाजिक बांधीलकी व मदतीचा हात म्हणून या मुलांना कपडे, खेळणी आणि ग्रंथ प्रा. बोंडगे यांच्यातर्फे देण्यात आले. थोरा-मोठ्याची चरित्रे त्यांचे कार्य या चिमुकल्यांना लक्षात यावे यासाठी महात्मा गांधी, पं. जवाहरलाल नेहरू, लालबहादूर शास्त्री, महात्मा फुले, सावित्रीबाई फुले, डॉ बाबासाहेब आंबेडकर, राणी लक्ष्मीबाई , अहिल्याबाई होळकर, संत तुकाराम, संत गाडगे महाराज, संत कबीर, छत्रपती शिवाजी महाराज, राजमाता जिजामाता, क्रांतिकारक भगतसिंह, वीर सावरकर, स्वामी विवेकानंद, राष्ट्रपती डॉ. ए. पी. जे. कलाम यांच्या चरित्र ग्रंथाचा यात समावेश आहे.
या प्रसंगी प्रा॰ मीनाक्षी बोंडगे, दयाराम सुडे,  प्रगत शेतकरी जगन्नाथ सुडे, मीरा सुडे, कृषी सहाय्यक रेश्मा शेख आणि प्रकल्प अधिकारी सोनवणे आणि आदी उपस्थित होते.
सुपर फास्ट महाराष्ट्र न्यूज आमच्या पोर्टला व्हिसिट केल्याबद्दल आपले आभारी आहोत.जाहिरातीसाठी संपर्क करा.superfastmaharashtraa@gmail.com