वाढत्या वयामुळे वाढत आहे वंध्यत्वाचे धोके....-डॉक्टर प्राजक्ता काटदरे ..विशेष मुलाखत सुपरफास्ट महाराष्ट्र न्यूज टीम ..
https://youtu.be/zCQTXwSeYhQ *चॅनलला सबस्क्राईब करा*
वाढत्या वयामुळे वाढत आहे वंध्यत्वाचे धोके.. डॉक्टर प्राजक्ता काटदरे ..
सुपरफास्ट महाराष्ट्र न्यूज ला मुलाखत देताना डॉक्टर प्राजक्ता काटदरे यांनी सांगितलं कि ,वय वाढल्यामुळे वंध्यत्वाचे प्रमाणही वाढत आहे व गर्भधारणेमध्ये अडचणी येत आहे. दैनंदिन जीवनात शिक्षण करिअरयामुळे लोकांना वेळ नसल्यामुळे दैनंदिन जीवनशैलीत बदल झाला आहे .यामुळ गर्भधारणा होण्यासाठी व प्रसूतीसाठी धोके वाढत आहे ही भविष्यासाठी अत्यंत धोकादायक बाब आहे.
नियमित पोषक आहार घेणे गरजेचे आहे व योग्य वयात विवाह होऊन प्रसूती होणं स्वास्थ्याच्या दृष्टीने महत्त्वाचा आहे.. अशा त्या सुपरफास्ट महाराष्ट्र न्यूज ला मुलाखत देताना म्हणाल्या. सुपरफास्ट महाराष्ट्र न्यूज ची ही मुलाखत डॉक्टर अमोल जाधव वैद्यकीय समिती राज्य अध्यक्ष यांनी घेतली व त्यांना सहकार सुपरफास्ट महाराष्ट्र न्युज चे वैद्यकीय प्रतिनिधी गंगाधर पवार व सुपरफास्ट महाराष्ट्र न्यूज टीम ने सहकार्य केले. ही मुलाखत पाहण्यासाठी. YouTube ला superfast Maharashtra या ठिकाणी आपल्याला बघता येईल .
महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध
डॉक्टर प्राजक्ता काटदरे यांच्या बद्दल थोडीशी माहिती.
डॉ. प्राजक्ता काटदरे या प्रस्थापित स्त्रीरोगतज्ञ आणि प्रसूतीतज्ञ आणि वंध्यत्व तज्ज्ञ असून या क्षेत्रातील 15 वर्षांचा अनुभव आहे. त्यांनी एमजीएम मेडिकल कॉलेज, नवी मुंबई येथून एमबीबीएस पूर्ण केले आहे आणि त्यानंतर डॉ. बाळाभाई नानावटी हॉस्पिटल, मुंबई येथून स्त्रीरोग आणि प्रसूतीशास्त्रात स्पेशलायझेशन केले आहे. त्यांनी प्रतिष्ठित लोकमान्य टिळक म्युनिसिपल मेडिकल कॉलेज आणि हॉस्पिटलमधून वंध्यत्व आणि एंडोस्कोपीचा प्रगत अभ्यासक्रम देखील केला आहे. (LTMMC), सायन, मुंबई.
वैद्यकीय क्षेत्रातील विशेष कार्य :-
डॉ. प्राजक्ता काटदरे नियमित प्रसूती व्यवस्थापन तसेच उच्च जोखमीच्या गर्भधारणेमध्ये अत्यंत निपुण आहेत .वंध्यत्व व्यवस्थापनात विशेष रस आहे. जिथे त्यांनी एक दशकाहून अधिक काळ प्रॅक्टिसमध्ये असंख्य जोडप्यांना मातृत्व मिळवून देण्यासाठी मदत केली आहे. त शैक्षणिक क्षेत्रातही त्या कार्यरत आहे . विविध राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय जर्नल्समध्ये त्यांच्या नावावर अनेक पेपर आणि प्रकाशीत झालेले आहे आहेत. डॉ प्राजक्ता काटदरे यांची सध्या विक्रोळी येथील डॉ सराफ स्पेशालिटी क्लिनिकमध्ये स्वतःची प्रॅक्टिस आहे. त्या गोदरेज मेमोरियल हॉस्पिटल , विक्रोळी आणि अंकुर हॉस्पिटल , कांजूरमार्ग येथे देखील संलग्न आहेत .
http://www.drprajaktakatdare.com
अधिक मुलाखत बातम्या साठी संपर्क करा आमच्या सुपरफास्ट महाराष्ट्र न्यूज
प्रतिनिधी गंगाधर पवार यांच्याशी संपर्क साधा
📞73508 43501