सुपर फास्ट महाराष्ट्र न्यूज पोर्टल मध्ये आपले स्वागत आहे.जाहिरातीसाठी संपर्क करा.superfastmaharashtraa@gmail.com

ग्रामसेवक युनियनचे राज्य अध्यक्ष एकनाथरावजी ढाकणे यांच्या उपस्थितीत निवड प्रक्रिया संपन्न

महाराष्ट्र राज्य ग्रामसेवक युनियन डीएनई १३६ लातूर जिल्हा अध्यक्षपदी `आनंत सूर्यवंशी` यांची तर सचिवपदी `श्याम मुस्के` यांची निवड



ग्रामसेवक युनियनचे राज्य अध्यक्ष एकनाथरावजी ढाकणे यांच्या उपस्थितीत निवड प्रक्रिया संपन्न

 प्रतिनिधी गंगाधर पवार
लातूर : महाराष्ट्र राज्य ग्रामसेवक युनियन डीएनई १३६ लातूर जिल्हा अध्यक्षपदी `आनंत हरीचंद्र सूर्यवंशी` यांची निवड झाली आहे. मागील अनेक वर्षांपासून संघटनेच्या माध्यमातून ग्रामसेवकांचे प्रश्न सोडवत असल्याने ग्रामसेवकांनी सूर्यवंशी यांना काम करण्याची संधी दिली आहे. रविवारी ग्रामसेवक युनियनच्या जिल्हा अध्यक्ष पदाच्या निवडीसाठी संस्कृती मंगल कार्यालय,अहमदपूर येथे बैठक बोलवण्यात आली होती. यावेळी ग्रामसेवक जिल्हा युनियनच्या अध्यक्षपदाची निवड मतदान पद्धतीने घेण्यात आली. त्यामध्ये सर्वानुमते आनंत सूर्यवंशी यांना संघटनेच्या जिल्हाध्यक्षपदी निवडीची घोषणा करण्यात आली. जिल्हा सचिवपदी श्याम मुस्के यांची बिनविरोध निवड करण्यात आली. जिल्हा युनियनची उर्वरित कार्यकारिणीची पदे जिल्हा युनियनच्या पुढच्या बैठकीमध्ये होणार आहे. ग्रामसेवकांनी दाखवलेल्या विश्वासाला तडा जाऊ देणार नाही,असे नुतन अध्यक्ष आनंत सूर्यवंशी यांनी निवडीनंतर सांगितले़. या बैठकीला राज्य संघटनेचे अध्यक्ष एकनाथराव ढाकणे, राज्याचे सरचिटणीस प्रशांत जामोदे, राज्य कोषाध्यक्ष संजीव निकम यांची प्रमुख उपस्थिती होती तर विभागीय उपाध्यक्ष मराठवाडा तथा निवडणूक निर्णय अधिकारी देविदास चव्हाण, विभागीय सहसचिव मराठवाडा तथा निवडणूक निरीक्षक नारायणराव बडे, सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी हणमंतराव मुरुडकर म्हणून उपस्थित होते.
सुपर फास्ट महाराष्ट्र न्यूज आमच्या पोर्टला व्हिसिट केल्याबद्दल आपले आभारी आहोत.जाहिरातीसाठी संपर्क करा.superfastmaharashtraa@gmail.com