फुलंब्री पंचायत समितीत वावना येथील अतुल जाधव यांच्या हस्ते वारिष्ट्य लिपिक सराटे 2500रुपयाची लाच घेताना पकडला ..
फुलंब्री पंचायत समितीत वावना येथील अतुल जाधव यांच्या हस्ते
वारिष्ट्य लिपिक सराटे 2500रुपयाची लाच घेताना पकडला ..
फुलंब्री पंचायत समिती लिपिक यांनी
4000 रुपये लाचेची मागणी विहीर च अंतिम बिल काढण्यासाठी वावना येथील शेतकरी अतुल जाधव यांना केली होती. विहिरी च पूर्ण खोदकाम व बांधकाम झालेल असताना. विहीर चा अंतिम निधी टाकण्यासाठी 4000हजार ची लाच माघितली होती. तडजोड मध्ये 2500देण्याचं ठरवलं. विहिरी च सर्व निकष नुसार खोदकाम व बांधकाम झालं असून तर सरकार चा निधी टाकण्यासाठी लाचेची मागणी करणाऱ्याला वरिष्ठ लिपिक संजय सराटे यांना अतुल जाधव यांना कायदेशीर नसल्या मुळं लाच लुचपत प्रतिबंधक कार्यालय कडे अतुल जाधव यांनी तक्रार केली होती. त्यामुळं मंगळवार 5:30वाजता रंगेहाथ सराटे यांना पकडण्यात आलं आहे.
कारवाई दरम्यान कार्यालय उपस्थित कर्मचारी लाच लुचपत पथकाची धाड पडताच गायफ झाले होते. यामुळे पचयात समिती चे धाबे दणाणले. फुलंब्री तालुक्यातील अनेक लोकांचा विहिरीच्या खोदकामाचे पैसे असेल, घरकुल चे पैसे असेल, अनेक शासकीय योजनेचे पैसे, या मध्ये अनेक प्रकारचा अफरातफर झालेला आहे. परंतु या विरोधात कोणी कारवाई करायला समोर येत नव्हतं.अतुल जाधव यांनी तक्रार करत एक आदर्श निर्माण केला आहे. यामुळे प्रहार जिल्हाध्यक्ष सुधाकर शिंदे, सुदाम गायकवाड, राम गाडेकर, मंगेश साबळे, गजानन गायकवाड, डॉ अमोल जाधव, योगीराज तुपे पाटील, बापू भुसारे, काकाजी काकडे, उमेश फलके आदी सामाजिक व राजकीय व पत्रकारिता क्षेत्रातील व्यक्तिमत्वांनी अतुल जाधव यांचे अभिनंद केले आहे
या कारवाई मध्ये
यातील तक्रारदार यांचे रोजगार हमी योजनेंतर्गत विहिरीच्या बांधकामाचे बिल मंजूर करण्यासाठी लाचेची मागणी स्वतः करुन, पंचासमक्ष लाचेची रक्कम 25,00/- स्वतः स्वीकारली असून आरोपी यास ताब्यात घेण्यात आले असून, पोलीस ठाणे फुलंब्रि येथे गुन्हा दाखल केला आहे
हनुमंत वारे पोलीस निरीक्षक,
सहायक सापळाअधिकारी श्रीमती दिपाली निकम (भामरे) ला.प्र.वि.औरंगाबाद.
मार्गदर्शक-
मा. डॉ. राहुल खाडे, पोलीस अधीक्षक,ला.प्र.वि.औरंगाबाद
मा.श्री. विशाल खांबे
अपर पोलीस अधीक्षक, ला.प्र.वि.औरंगाबाद.
मा.श्री. मारुती पंडित पोलीस उप अधीक्षक, ला.प्र.वि.
औरंगाबाद.
सापळा पथक - पो.ना. /बाळासाहेब राठोड , पो.ना./सुनील पाटील ला.प्र.वि औरंगाबाद व चांगदेव बागुल आदींनी आपले कर्तव्य बजावले आहे.
