सुपर फास्ट महाराष्ट्र न्यूज पोर्टल मध्ये आपले स्वागत आहे.जाहिरातीसाठी संपर्क करा.superfastmaharashtraa@gmail.com

औरंगाबाद जिल्ह्यातील पहिली अनुभव फुलंब्री तालुक्यातील पिक्चर स्टाईल सीन

 औरंगाबाद जिल्ह्यातील पहिली अनुभव फुलंब्री तालुक्यातील पिक्चर स्टाईल सीन

         नगराध्यक्ष सुहास शिरसाट यांची अ‍ॅम्ब्युलन्स आली आणि वडोद बाजार येथील पाकिजा पठाण महिला सरपंच झाली..

        नगराध्यक्ष सुहास शिरसाट यांची अ‍ॅम्ब्युलन्स आली आणि वडोद बाजार येथील पाकिजा पठाण महिला सरपंच झाली,चाणक्य म्हणून सुहास शिरसाठ यांचे सोशल मीडियावर शिरसाट यांची  सकाळपासून जोरदार चर्चा चालू होती

वडोद बाजार ग्रामपंचायतची निवडणूक ही खूप अटीतटीची झाली होती. सदस्य फुटू नयेत म्हणून त्यांना सुरक्षित ठेवणे गरजेचे होते. 

आजपर्यंत सरपंचपदाच्या निवडीसाठी आपण थेट हेलिकॉप्टरने सदस्य ग्रामपंचायत मध्ये दाखल झाल्याच्या घटना ऐकल्या असतील. मात्र, औरंगाबाद जिल्ह्यातील वडोद बाजार ग्रामपंचायतीचे सदस्य आज सरपंच निवडीसाठी चक रुग्णवाहिकेतून निवडीच्या ठिकाणी दाखल झाले  वडोद बाजार ग्रामपंचायतची निवडणूक ही खूप अटीतटीची झाली होती. सदस्य फुटू नयेत म्हणून त्यांना सुरक्षित ठेवणे गरजेचे होते. त्यासाठी या सदस्यांना आज सरपंच निवडीच्या ठिकाणी थेट रुग्णवाहिकेतून आणण्यात आले.यावेळी पाकिजा पठाण या महिलेची सरपंच पदी निवड करण्यात आली. त्यामुळे रुग्णवाहिकेतून आली आणि सरपंच झाली, अशी चर्चा संपूर्ण गावात रंगली आहे,

भाजपचे तालुकाध्यक्ष सुहास शिरसाट हे खूप राजकारणात गेम चेंजर मानले जातात हा इतिहास आहे आणि तो इतिहास त्यांनी पुन्हा एकदा करून दाखवला आहे फुलंब्री तालुक्यात सर्वात मोठी ग्रामपंचायत म्हणून वडोद बाजार ग्रामपंचायत ची ओळख आहे पण भाजपचं इथे बहुमत सिद्ध होत नव्हते आणि एका उमेदवाराची गरज होती त्याक्षणी काँग्रेसचा एक उमेदवार फोडून भाजपा तालुका अध्यक्ष सुहास शिरसाट यांनी त्याचा  भाजपमध्ये प्रवेश करून घेतला. ग्रामपंचायत मध्ये सदस्य करता येईल या गोष्टीवर संपूर्ण तालुक्याचे लक्ष होतं पण आणि विरोधक देखील टाळे ठोकून रस्त्यावर बसले होते पण सुहास शिरसाट यांना चाणक्य मानले जातात रुग्णवाहिकेच्या मदतीने आठ सदस्य रुग्णवाहिकेत बसून त्यांना ग्रामपंचायत मध्ये सोडण्यात आले कोणाला ब्रह्म सुद्धा निर्माण नाही झाला कि या गाडीमध्ये ग्रामपंचायत सदस्य आहे म्हणून आणि त्याच्या दोन किलोमीटर मागे नगराध्यक्ष सुहास शिरसाट आणि भाजप पदाधिकारी त्यांच्या नेहमीच्या गाड्यांना वापरतात बाहेर जिल्ह्यातून गाड्या मागून त्या गाडीमधून गावांमध्ये घुसले गावात कोणाला सुद्धा कळले नाही की त्या गाडीमध्ये तालुका आध्यक्ष व शिरसाट व त्यांचे पदाधिकारी होते आणि सरपंच आणि उपसरपंच झाल्यानंतर संपूर्ण तालुक्यात हा पिक्चर सारखा सीन समजण्यात आला.

सुपर फास्ट महाराष्ट्र न्यूज आमच्या पोर्टला व्हिसिट केल्याबद्दल आपले आभारी आहोत.जाहिरातीसाठी संपर्क करा.superfastmaharashtraa@gmail.com