सुपर फास्ट महाराष्ट्र न्यूज पोर्टल मध्ये आपले स्वागत आहे.जाहिरातीसाठी संपर्क करा.superfastmaharashtraa@gmail.com

महात्मा गांधी जयंती कार्यक्रम संपन्न

 महात्मा गांधी जयंती कार्यक्रम संपन्न



    *राहुल दुरतकर , जिल्हा प्रतिनिधी वर्धा*                                             वड्णेर :-   श्री साईबाबा लोकप्रबोधन कला महाविद्यालय ,वडनेर येथे राष्ट्रपिता महात्मा गांधी यांची जयंती दिनाचा कार्यक्रम संपन्न झाला.या कार्यक्रमाचे अध्यक्ष महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.उत्तमराव पारेकर ,प्रमुख अतिथी अविनाश गमे,प्रमुख उपस्थिती डॉ.सारिका चौधरी,प्रमुख वक्ते डॉ.विठ्ठल घीनमीने ,सांस्कृतिक विभाग समन्वयक डॉ .प्रवीण कारंजकर मंचावर उपस्थित होते.

 कार्यक्रमाचा प्रारंभ  राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून आणि दीपप्रज्वलन करून झाला.

  यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.उत्तमराव पारेकर यांनी महात्मा गांधी यांचे जीवन आणि कार्य यावर आपल्या विचारातून प्रकाश टाकला.आजच्या संदर्भात गांधीविचारांची आवश्यकता त्यांनी सर्वासमोर मांडली.तर प्रमुख वक्ते डॉ.विठ्ठल घीनमीने यांनी महात्मा गांधीचे आर्थिक विचार ,ग्रामीण अर्थव्यवस्था , याबाबत गांधी विचारांची अपरिहार्यता आपल्या विचारातून व्यक्त केली.

   या कार्यक्रमाचे संचालन आणि आभार प्रदर्शन डॉ .प्रवीण कारंजकर यांनी केले.या कार्यक्रमाच्या वेळी महाविद्यालयातील डॉ.नरेश भोयर.प्रा.विनोद मुडे,प्रा.नितेश तेलहांडे,प्रा.पंकज मून.डॉ गणेश बहाद, नरेश कातडे,शंकरराव कापसे,संजय पर्बत,  प्रीती सायंकर ,अरुण तिमांडे,सुरेश तेलतुबडे,अंकुश वैद्य,विजयालक्ष्मी जारोंडे यांची उपस्थिती होती.                                                      *राहुल दुरतकर , जिल्हा प्रतिनिधी वर्धा 9923937033*

सुपर फास्ट महाराष्ट्र न्यूज आमच्या पोर्टला व्हिसिट केल्याबद्दल आपले आभारी आहोत.जाहिरातीसाठी संपर्क करा.superfastmaharashtraa@gmail.com