सुपर फास्ट महाराष्ट्र न्यूज पोर्टल मध्ये आपले स्वागत आहे.जाहिरातीसाठी संपर्क करा.superfastmaharashtraa@gmail.com

वावना येथील ग्रामसेविकिची हुकुमशाही.

 वावना येथील ग्रामसेविकिची हुकुमशाही. 

 सुपरफास्ट महाराष्ट्र न्युज

प्रतिनिधी कानोले साईनाथ 



वावना येथील ग्रामपंचायत ने तलावात मत्सबीज   टाकण्यासाठी गावातील एका व्यक्ती कडून पैसे घेतले होते. पैसे घेऊन त्याला पावती दिली नाही. मत्सबीज टाकलेले तलाव सोसायटीचे असल्याने सोसायटीने अधिकार सांगितल्यावर झोपलेल्या ग्रामपंचायत जाग आली. मत्सबीज टाकलेल्या व्यक्तीचे ग्रामपंचायतला दिलेले पैसे व मत्सबीज ला लागले पैसे वाया जात आहे असं वाटल्याने त्या व्यक्तीने ए आय एस वैद्यकीय समिती राज्याध्यक्ष डॉ अमोल जाधव यांच्या कडे तक्रार केली असता. डॉ अमोल जाधव व ग्रामसेविका इंगोले यांच्या चर्चा झाली. 

तक्रारदाराला मी चप्पलने मारते असं  म्हणून त्यांनी  दुसऱ्या दिवशी तक्रारदारा वर  खोटे गुन्हे नोंद करण्याच्या धमक्या ग्रामसेविका ने  दिल्या यामुळे पैसे दिलेले व्यक्तीमध्ये घबराटीचे वातावरण निर्माण झाले आहे. 

ग्रामपंचायत च्या ग्रामसभा घेण्यास टाळा टाळ करणे. 

गावात रोज उपस्थित न राहणे. 

आरोग्य केंद्रमध्ये GNM च पद 2वर्षांपासून रिक्त आहे त्या संदर्भात आरोग्य विभागला कुठलाही पत्रव्यव्हार न करणे. 

भिक्कन जाधव व कैलास काकडे याच्या कार्यकाळात झालेले चांगले काम रोड तोडफोड करणे.

पैसे घेऊन पावत्या न देणे. कोण्ही तक्रार केल्यास त्यांना हुकूमशाही पद्धतीने  खोटे गुन्हे नोंद करण्याचा धाक दाखवने. अशे अनेक मनमानी कारभार ग्रामसेवक इंगोले करत असल्या कारणाने त्यांच्यावर औरंगाबाद जिल्हा अधिकाऱ्यांन कडे तक्रार दाखल करण्यात आली आहे. 

यानंतर गावातील कोन्हालाही धमकावल्यावर धडाकेबाज कायदेशीर प्रतिउत्तर देण्यात येईल असं डॉ अमोल जाधव म्हणाले . ग्रामपंचायत मधील एका कर्मचाऱ्याने सांगितले आहे कि पैसे तक्रार दराने दिले आहे पण पावती  दिली नाही. नाव न सांगण्याचे अटीवर कर्मचाऱ्याने ही माहीती दिली. 

ग्रामसेविका इंगोले यांनी गोरगरीबचे पैसे घेऊन त्यांना धमकवण सोडा लावा अन्यथा ए आय ए स वैद्यकीय समिती मार्फत पंधरा अक्टोम्बर पासून जिल्हा अधिकारी कार्यालया समोर बेमुदत  अमरन उपोषण करण्यात येईल अस  इशारा राज्याध्यक्ष डॉ अमोल जाधव यांनी दिला  आहे.

 सुपरफास्ट महाराष्ट्र न्युज

सुपर फास्ट महाराष्ट्र न्यूज आमच्या पोर्टला व्हिसिट केल्याबद्दल आपले आभारी आहोत.जाहिरातीसाठी संपर्क करा.superfastmaharashtraa@gmail.com