T1 अवनी वाइल्ड लाईफ प्रोटेकशन क्लब राळेगाव यांनी दिले अजगराला जीवदान.
T1 अवनी वाइल्ड लाईफ प्रोटेकशन क्लब राळेगाव यांनी दिले अजगराला जीवदान.
राळेगाव तालुक्या मध्ये प्राणी मित्र .T1 अवनी वाइल्ड लाईफ प्रोटेकशन क्लब. या नावाने संस्था काही काळापासून कार्यरत आहेत. नेहमी प्रमाणेच त्यांना असाच एक फोन किशोर वाघ राहणार येवती यांचा शेताच्या शेत तळ्या मध्ये साप दिसल्याची त्यांनी माहिती दिली.क्षणाचाही विलंब न करता राळेगाव येथील T1 अवनी वाइल्ड लाईफ प्रोटेकशन क्लब राळेगाव टीममधील सदस्य विजय सूर्यवंशी , शुभम पाल , आशिष येरकाडे , तुषार दारूनकर, प्रेम गहरवाल , निलेश जोगे, शुभम जोगे, ऋषभ भोयर यांनी तिथे जाऊन पाहणी केली असता . तिथे त्यांना अजगर या जातीचा साप शेताच्या तळ्या मध्ये दिसून आला . त्याला अतिशय चपळाईने आपल्या ताब्यात घेतले व तेथील उपस्थित व्यक्तींना त्या सापाची माहिती दिली.
माहिती : - अजगर या सापाची अधिकतम लांबी . 760 से.मी. (24 फीट 11 इंच ) इतकी असते. रंग व आकार: - राखाडी किंवा फिकट तपकिरी गडद तपकिरी धाब्बे पोटाकडचा भाग पांढरा किंवा फिकट पिवळसर शरीर स्थूल खवले मऊ डोक्यावर कोणासारखी आकृती डोळ्यातल्या बाहुल्या उभ्या. शेपटी आखूड
प्रजनन :- पाळापाचोळ्याचा ढीग करून मादी त्यात 20 ते 80 अंडी घालते. 90 ते 100 दिवसात पिल्ले अंड्यातून बाहेर येतात.
वैशिष्टये:- निशाचर. जबड्याच्या पुढील टोकावर असलेल्या उष्णसवेदनाग्राहक खाचामुळे त्यांना भक्ष्य शोधण्यास मदत होते . भक्ष्याला तोंडाने पकडल्यावर शरीराला विळखा घालतो व आवळून गुदमरून मारतो मग भक्षाचा तोंडाकरून सुरुवात करून गिळतो मध्यम आकाराचा प्राणी पचवायला त्याला अंदाजे तीन आठवडे लागतात वन्यजीव स्वरंक्षण कायदा अंतर्गत वन्यजीवांच्या वर्गवारी शेड्युल (2) मध्ये येतो.
सुपर फास्ट महाराष्ट्र न्युज राळेगाव तालुका प्रतिनिधी वृषभ दरोडे जाहिरातीसाठी व बातमी साठी संपर्क करा 9011356141
