सुपर फास्ट महाराष्ट्र न्यूज पोर्टल मध्ये आपले स्वागत आहे.जाहिरातीसाठी संपर्क करा.superfastmaharashtraa@gmail.com

वर्धेचे नवे पोलीस अधिक्षक प्रशांत होळकर

 वर्धेचे नवे पोलीस अधिक्षक प्रशांत होळकर 



       *राहुल दुरतकर ,  वर्धा जिल्हा प्रतिनिधी* 

         राज्याच्या गृह विभागाने २२ पोलीस अधिकाऱ्यांच्या बदलीचे काल सांयकाळी १७ सप्टेंबर रोजी आदेश पारीत केले. वर्धेचे पोलीस अधिक्षक बसवराज तेली यांचे जागेवर प्रशांत होळकर यांची बदली कपण्यात आली आहे .

प्रंशात होळकर सध्या अमरावती येथे पोलीस उपायुक्त (मुख्यालय) पदावर कार्यरत आहे .यापुर्वी मुंबई मध्ये राज्य गुप्तवार्ता विभागात उपायुक्त पदावरुन त्यांची बदली अमरावती येथे झाली होती , वाशीम येथे २०१६ पोलीस अधिक्षक म्हणुन कार्यभार सांभाळला. 

पुर्व विदर्भात पाच जिल्यांचे तर पश्चिम विदर्भात दोन जिल्ह्यातील पोलीस अधिक्षकांच्या पदस्थापनेचे आदेश पारीत झाले . पोलीस अधिक्षक बसवराज तेली यांचे सह अनेक अधिकाऱ्यांचे स्वतंत्र पदस्थापनेचे आदेश काढण्यात येणार आहे.                                                      *राहुल दुरतकर ,  वर्धा जिल्हा प्रतिनिधी* 9923937033

सुपर फास्ट महाराष्ट्र न्यूज आमच्या पोर्टला व्हिसिट केल्याबद्दल आपले आभारी आहोत.जाहिरातीसाठी संपर्क करा.superfastmaharashtraa@gmail.com