सुपर फास्ट महाराष्ट्र न्यूज पोर्टल मध्ये आपले स्वागत आहे.जाहिरातीसाठी संपर्क करा.superfastmaharashtraa@gmail.com

शिवसेनेने वीज बोर्डाच्या कार्यलयाला ठोकले टाळे.......

 *सुपर फास्ट महाराष्ट्र न्यूज़ गंगापुर तालुका प्रतिनिधी फिरोज मन्सुरी शेख....*


*शिवसेनेने वीज बोर्डाच्या कार्यलयाला ठोकले टाळे.......*




गंगापूर तालुक्यातील लासुर स्टेशन येथील महावितरण कार्यलयात गेल्या कित्येक वर्षांपासून कायमस्वरूपी विद्युत अभियंता नसल्याने येथील विजसमस्या मात्र विजग्राहकाना मनस्ताप देत असून कर्मच्याऱयांवर अधिकाऱ्यांचा वचक नसल्याने लासुर स्टेशन येथील महावितरण कार्यालय असून अडचण नसून खोळंबा अशी विचित्र परिस्थिती निर्माण झाली होती याबाबत परिसरातील नागरिकांनी याबाबत शिवसेना शहरप्रमुख अमोल शिरसाठ व नितीन कांजूने यांच्याकडे लक्ष देण्याची मागणी केली होती त्यामुळे वारंवार शिवसेनेच्या वतीने गंगापुर,लासुर,येथील महावितरण कार्यालयात नागरिकांच्या तक्रारीबाबत समज दिली होती मात्र महावितरण कार्यालय कुंभकर्णी झोपेचे सोंग घेत होती त्यामुळे आज शिवसेनेने लासुर स्टेशन येथील महावितरण कार्यालय गाठून कुलूप ठोकले व जोपर्यंत लासुर स्टेशन येथील कार्यलयात कायमस्वरूपी अभियंता येत नाही तोपर्यंत ठिय्या मांडल्याने गंगापूर येथील महावितरणचे अधिकारी खडबडुन जागे झाले व हालचाली सुरू झाल्या मात्र तरीही असे लेखी आश्वासन दिले की कायमस्वरूपी अभियंत्याची आदेश येईपर्यंत प्रदीप नरोडे हे रोज कार्यलयीन वेळेत सकाळी 10 ते 2 पर्यंत वीज ग्राहकांच्या प्रश्न व तक्रारी निकाली काढणार असल्याचे लेखी आदेश दिले आहे.

                          दरम्यान यावेळी शिवसेना शहरप्रमुख अमोल शिरसाठ माजी शहरप्रमुख नितीन पा कांजुने, युवासेना विभागप्रमुख नितीन गाडेकर, युवासेना शहर अधिकारी मयूर जैस्वाल ,व्यापारी आघाडी प्रमुख अनिल घोडके, संदीप आमराव ,शाखा प्रमुख सोमा पा निकम, योगेश तायडे ,लखन गुजर ,बाळा खिल्लारे ,कृष्णा माळोदे ,मोनू खंडेलवाल ,धनंजय मुळे ,आदेश रणयेवले प्रदीप वाकळे आदिंसह शिवसैनिकांची उपस्थिती होती.

सुपर फास्ट महाराष्ट्र न्यूज आमच्या पोर्टला व्हिसिट केल्याबद्दल आपले आभारी आहोत.जाहिरातीसाठी संपर्क करा.superfastmaharashtraa@gmail.com