सुपर फास्ट महाराष्ट्र न्यूज पोर्टल मध्ये आपले स्वागत आहे.जाहिरातीसाठी संपर्क करा.superfastmaharashtraa@gmail.com

काहीही फायदा नाही तुमच्या गावाचा *पंतप्रधान* जरी असला तरी आमदारांच्या गावात लाईट नाही २४तास कशाला पाहिजे *पगारी* लोकप्रतिनिधी

 सुपरफास्ट महाराष्ट्र न्युज

औरंगाबाद प्रतिनिधी अनिरुध्द भारद्वाज

मो,9890557747

काहीही फायदा नाही तुमच्या गावाचा *पंतप्रधान* जरी असला तरी  आमदारांच्या गावात लाईट नाही २४तास

कशाला पाहिजे *पगारी* लोकप्रतिनिधी




#दि२१सप्टेंबर२०२० रोजी महावितरण उपअभियंता गायकवाड यांना मनसे शेतकरी सेनेच्या वतीने खालील मागण्याचे निवेदन देण्यात आले. 


*१_लासुरस्टेशन* सबस्टेशन कार्यालय कायमस्वरूपी सहाय्यक अभियंता पदावर गेल्या ६ महिन्यापासून अभियंता नसल्याने ग्राहकांना चांगली सेवा मिळत नसल्याच्या अनेक तक्रारी प्राप्त झाल्या आहेत त्यामुळे तात्काळ कायमस्वरूपी सहाय्यक अभियंता नेमण्यात यावा. 

*२_डोणगाव व लासुरस्टेशन* येथे दुरूस्ती पथक किंवा जबाबदार व्यक्तीची नेमणूक करण्यात यावी. 

*३_कोरोना* काळातील विज बिले आता सप्टेंबर महिन्यात देण्यात आली आहे ती  मिटर प्रमाणे बिले दिलेली नाहीत ती देण्यात यावी. 

*४) मार्च २०२० ते आॅगस्ट २०२०* पर्यंत बिल एकञीत देण्यात आल्यामुळे ज्या मासिक वापर ०-१०० युनिट आहे त्यांना सरळ १००- ३०० युनिट किवा त्यापेक्षा जास्तीच्या युनिट प्रमाणे बिले आकारण्यात आली आहे ती तात्काळ बदलुन देण्यात यावी. (प्रत्येक ग्राहकांना साधारण ५० ते २०००रूपये पर्यंत अतिरिक्त बिले देण्यात आली आहेत) 

*५_पावसाळ्यात* वीजपुरवठा वारंवार खंडतील होत असतो त्यामुळे गंगापुर तालुक्यात तात्काळ दुरूस्ती करण्यासाठी आवश्यक सामग्री पुरवठा तसेच कंञाटदाराची नेमनुक करण्यात यावी. 

*६)२०१३पासुन* आज पर्यंत गंगापुर तालुक्यातील विविध योजना द्वारे सिंगल फेज घरगती, शेत वस्तीवर विज तसेच ३ फेज कृषी जोडणीसाठी कोटेशंन भरुन घेण्यात आली आहे ती तात्काळ मंजुर करू देण्यात यावी. 

*७)कोरोना* काळात अनेक ग्राहकांचे आर्थिक नुकसान झाले आहे त्यामुळे एकतर कोरोना काळातील बिले माफ करावी किवा त्यांना सवलत देण्यात यावी कोणाचाही पुरवठा बंद करू नये. 

*८)गंगापुर* तालुक्यातील प्रत्येक गावाचा सद्याचा पुरवठा व वापर याचे सर्वेक्षण करून नवीन प्रस्तावित टिपी देण्यात यावी किवा टिपीची संख्या व क्षमता वाढविण्यासाठी यावी. 


वरिल सर्व बाबतीत आपण आपल्या वरिष्ठ अधिकारी यांच्या सोबत चर्चा करून तात्काळ कार्यवाही करावी नसता दि २८ सप्टेंबर २०२० सकाळी ११.००वा.रोजी गंगापुर कार्यालयात किवा लासुरस्टेशन कार्यालयात ग्राहकांच्या वतिने आंदोलन करण्यात येईल असा इशारा *मनसे शेतकरी सेनेचे* इंजी महेशभाई गुजर, *प्रहार* शेतकरी संघटनेचे भाऊसाहेब शेळके,लक्ष्मण मांडवगड, *युवा प्रतिष्ठानचे* विशाल लांडगे यांच्या वतीने देण्यात आला.

सुपर फास्ट महाराष्ट्र न्यूज आमच्या पोर्टला व्हिसिट केल्याबद्दल आपले आभारी आहोत.जाहिरातीसाठी संपर्क करा.superfastmaharashtraa@gmail.com