सुपर फास्ट महाराष्ट्र न्यूज पोर्टल मध्ये आपले स्वागत आहे.जाहिरातीसाठी संपर्क करा.superfastmaharashtraa@gmail.com

दिनवाडा येथे एल अँड टी कंपनीतर्फे गरजुंना किराणा किट वाटप....*

 *सुपर फास्ट महाराष्ट्र न्यूज़ गंगापुर तालुका प्रतिनिधी फिरोज मन्सुरी शेख.....*


 *दिनवाडा येथे एल अँड टी कंपनीतर्फे गरजुंना  किराणा किट वाटप....*



गंगापुर तालुक्यातील दिनवाडा गावात एल अँड टी फायनॅन्सीयल कंपनी व दिलासा यांच्या संयुक्त विद्यमाने सुरू असलेल्या जलवैभव प्रकल्प अंतर्गत गंगापूर येथील काही गावांमध्ये पाणलोट कार्यक्रम तसेच शेतकऱ्यांनच्या हितासाठी विविध उपक्रम सुरू आहेत या उपक्रम अंतर्गत सुरू असलेल्या कामांसोबत गावात मियावकी पद्धतींत घन-वन ही करण्यात आले आहे . या वर्षी कोरोनाच्या महाभयंकर महामारीमुळे ग्रामीण भागातील गरजू व इतर लोकांना आपल्या सामाजिक दायिताव निधी अंतर्गत मदत करावी या उदेशाने आज दिनवाडा,वैरागड,सनव,देवळी ग्रुप ग्राम पंचायत असलेल्या दिनवाडा येथे रेशन किट वाटप करण्यात आले यापूर्वी एल अँड टी कँपनी ने  देवळी ,गाजगाव,खादगाव, सुल्तानाबाद या गावांमध्येही  गरजू व इतर कुटुंबाना राशन किट देऊन मदत करण्यात आली या राशन किट मध्ये तेल, गेहू , तांदूळ व इ. जे दैनंदिन जीवनासाठी आवश्यक असतात आशा गोष्टी पुरविण्यात आल्या आहेत या उपक्रमासाठी दिलासा संस्थेकडून गंगापूर अधिकारी अशोक सातपुते, वैशाली खाडिलकर, मोहसीन अहमद, प्रवीण निकम , अंतर्यामी कर्जे  व अजय तायड़े सह कृषिसेवक संजय केळकर,गावकरी सचिन आव्हाळे, सरपंच डॉ.गणेश ठोबरे,पोलिस पाटील राजू मोरे,उपस्थीत होते तसेच गावातील लाभार्थी व  इतर मान्यवर उपस्थित होते.

सुपर फास्ट महाराष्ट्र न्यूज आमच्या पोर्टला व्हिसिट केल्याबद्दल आपले आभारी आहोत.जाहिरातीसाठी संपर्क करा.superfastmaharashtraa@gmail.com