उंदीरवाडी चे विद्यार्थी अभ्यासा बरोबर संगीत, तबला, पेटी वादन शिकत आहेत....*
*सुपर फास्ट महाराष्ट्र न्यूज़ गंगापुर तालुका प्रतिनिधी फिरोज मन्सुरी शेख....*
*उंदीरवाडी चे विद्यार्थी अभ्यासा बरोबर संगीत, तबला, पेटी वादन शिकत आहेत....*
कोरोनामुळे गेल्या काही महिन्यापासून शाळा बंद असल्यामुळे सकाळी पाठीवर दप्तर घेऊन शाळेकडे पळणारे चिमुकल्यांची लगबग आता दिसत नाही. ग्रामीण भागातील अनेक पालकाकडे अँड्रॉइड मोबाइल उपलब्ध नाही जर उपलब्ध झालाच तर नेट बॅलन्स नाही अशीच सर्वत्र परिस्थिती आहे तरीही प्रतिकूल परिस्थितीवर मात करीत जिल्हा परिषद प्राथमिक डिजिटल शाळा उंदिरवाडी चे उपक्रम शील शिक्षक अंगद लोणे यांनी विद्यार्थ्यांना ज्ञान देण्याचे कार्य चालूच ठेवले आहे विविध गटाच्या माध्यमातून त्यांना आठवड्यातून एक दिवस वेळ देऊन त्यांचा अध्ययन-अध्यापन तपासून त्यांना मार्गदर्शन करण्यात येत आहे. त्यांच्या पालकांना किंवा त्यांच्या नातेवाईकांना विविध पीडीएफ ,विविध व्हिडिओ त्यांच्या व्हाट्सअप वर पाठवण्यात येत आहेत व त्यांना विनंती करण्यात येत आहे की प्लीज आपल्या पाल्यांना हे व्हिडिओ आणि ही पीडीएफ दाखवा... वैजापूर तालुक्यातील लासुरगाव केंद्राचे कर्तव्यदक्ष केंद्रप्रमुख अशोक जी पगारे वारंवार आपल्या शिक्षकांना सूचना देत आहेत कि विद्यार्थ्यांना वाऱ्यावर सोडू नका त्यांना कोणत्या ना कोणत्या माध्यमातून कनेक्टिविटी ठेवा त्यांना अध्ययन अध्यापनात ठेवा. फोनवरून पालकांचा संपर्क ठेवून त्याचा फीडबॅक घेणे याचाच परिणाम एक सकारात्मक दिसत आहे. विद्यार्थी विविध चित्रकला व्हाट्सअप च्या माध्यमातून आपल्या गुरुजींच्या मोबाईलवर पाठवीत आहे विविध गणित सोडून व्हाट्सअप वर पाठवीत आहेत मराठी इंग्रजी शुद्धलेखन करून आपल्या गुरुजींच्या व्हाट्सअप वर पाठवत आहे..जिल्हा परिषद प्राथमिक डिजिटल शाळा उंदिरवाडी येथील विद्यार्थी अध्ययन अध्यापन प्रक्रिया सुलभ व मनोरंजनात्मक पणे व्हावे शालेय वातावरण भक्तिमय व्हावे अध्ययन अध्यापनात गोडी निर्माण व्हावी प्रत्येक मूल शाळेत यावं याच साठी सध्या कोरोना मुळे शाळा सुट्ट्या आहेत पण या सुट्टीतही विद्यार्थ्यांचे शिक्षण बंद नाही शाळा बंद आहे मात्र शिक्षण सुरू विद्यार्थी अध्ययन-अध्यापन ऑनलाइन पद्धतीने व गटाद्वारे व व गावातील कलावंतांच्या मदतीने अध्ययन अध्यापन करीत आहेत.. कोरोना महामारी दोन हजार एकोणवीस कालावधीत अनेक जण आपल्या विद्यार्थ्यांना ऑनलाइन व ऑफलाईन शिक्षण देण्यासाठी आपल्या परीने प्रयत्न करीत आहे आमच्या ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना गुणवत्तापूर्ण शिक्षण देण्यासाठी अनेक प्रयत्न करत आहोत यामध्ये विद्यार्थ्यांना निसर्गाच्या सानिध्यात देण्यासाठी शालेय परिसर अगदी कोकणा सारखी बनवून वर्गात न शिकवता शालेय परिसरात शिकवण्याचा प्रयत्न करतोय शाळेतील विद्यार्थ्यांना डिजिटल दुनिया स्पर्धा करण्यासाठी त्यांना संगणक हाताळण्यासाठी देऊन संगणकीय ज्ञान उपलब्ध करून देतो तसेच शाळेतील एलसीडी द्वारे इंटरनेटचा वापर करून युट्युब सारख्या माध्यमातून त्यांना अध्ययन अनुभव देतो तसेच आत्ताच ग्रामपंचायत च्या वतीने प्रोजेक्टर शाळेला मिळालेला आहे त्याचाही उपयोग शाळेसाठी शाळेच्या विद्यार्थ्यांना अध्ययन अध्यापनासाठी होणार आहे आमच्या शाळेतील सद्यस्थितीत कोरोना असल्यामुळे संगीत शिक्षण घेत आहेत गावातील गुरुकृपा चे गुरुजी लहान लहान विद्यार्थ्यांना विविध संगीत ज्ञान देत आहेत अगदी लहान लहान मुलेही अत्यंत उत्साहाने संगीत शिकत आहेत इयत्ता चौथीचा विद्यार्थी श्रीहरी शिवाजी कदम याने संगीताच्या मदतीने गीत गायन करत आहे... विविध पोवाडे विविध गीते विविध प्रार्थना विद्यार्थी अध्ययन अनुभूती घेत आहेत .
