सोलापूर/धुळे व मुंबई/नागपूर राज्य महामार्ग रस्त्यात खड्डे की खड्ड्यात रस्ते हेच कळेना जनते ने बेशरमाच झाड लावुन केला निषेध....*
*सुपर फास्ट महाराष्ट्र न्यूज़ गंगापुर तालुका प्रतिनिधी फिरोज मन्सुरी शेख.....*
*सोलापूर/धुळे व मुंबई/नागपूर राज्य महामार्ग रस्त्यात खड्डे की खड्ड्यात रस्ते हेच कळेना जनते ने बेशरमाच झाड लावुन केला निषेध....*
गंगापूर तालुक्यातील अनेक डांबरी रस्ते शेतवस्त्या यांना जोडणाऱ्या अनेक ग्रामीण रस्त्यांसह राज्य महामार्ग ही खड्डेमय झाल्याने प्रवाशी पुरते वैतागले असून रस्त्यात खड्डे की खड्ड्यात रस्ते हेच कळत नाही त्यात थोडा जरी पाऊस झाला तर या रस्त्यावरील खड्ड्यात पाणी साचून खड्ड्याच्या अंदाज येत नसल्याने अनेक अपघात होत असून अनेक हाडाचे आजार प्रवाश्याना होत असल्याने अक्सीडेन्ट हॉस्पिटल वाल्यांची मात्र चांदी होताना दिसत आहे.
याबाबत सुपर फास्ट महाराष्ट्र न्यूज़ च्या प्रतिनिधीं नी सोलापूर/धुळे ,मुंबई/ नागपूर,डोंणगाव रायपुर मार्गे औरंगाबाद ,देवगाव ते बोरगाव,गंगापूर ते देवगाव या रस्त्यावर प्रत्यक्ष जाऊन हातात मीटर टेप घेऊन मोजणी केली असता लासुर स्टेशन येथील देवगाव रस्त्यावर रस्त्यावर वीस ते तीस फुटापर्यंत लांबीचे तर दोन फूट खोलीचे खड्डे रस्त्यात पडलेले असून त्यात पाणी साचून गाळ झाला आहे व त्यात दुचा की स्लिप होऊन पडत असल्याने हे खड्डे अपघातास निमंत्रण देत असल्याने अनेक प्रवाशी च्या
मणक्याचे व हाडाचे आजार बळावत असल्याने गाड्या तर नादुरुस्त होतच आहे त्यात ऐन कोरोनो संसर्गाचा काळात प्रवाशी दवाखान्यात गेल्यावर डॉक्टर पहिले कोरोनॉची टेस्ट करण्यास सांगतात व पुढील उपचार नंतर करतात त्यामुळे प्रवाशी जास्त वैतागले असून लवकरात लवकर सोलापूर धुळे राज्य मार्गासह तालुक्यातील रस्त्याची डाग डुगी करणे गरजेचे आहे त्यामुळे लोकप्रतिनिधी याकडे लक्ष देण्याची आग्रही मागणी प्रवाशी करत आहे.
