सुपर फास्ट महाराष्ट्र न्यूज पोर्टल मध्ये आपले स्वागत आहे.जाहिरातीसाठी संपर्क करा.superfastmaharashtraa@gmail.com

डोणगाव ग्रामपंचायत सदस्य सह शिवसैनिक करणार आत्महत्या


*सुपर फास्ट महाराष्ट्र न्यूज़ गंगापुर तालुका प्रतिनिधी फिरोज मन्सुरी शेख.....*

*डोणगाव ग्रामपंचायत सदस्यासह शिवसैनिक करणार आत्मदहन....*


बिलाचा चेक बाऊन्स झाल्याने ग्रामसेवकावर कारवाई करण्याची मागणी......

गंगापूर तालुक्यातील डोणगाव येथे  जन-सुविधा अंतर्गत 2017-2018 स्मशानभूमी सुशोभीकरणाचे काम मंजूर होते ते काम पूर्ण झाले असून मासिक सभा ठराव क्रमांक सहा नुसार दिनांक 29. 8 .2019 रोजी झालेल्या मासिक सभेमध्ये ठराव मंजूर करून साहित्य पुरवठादार मिस्तरी यांच्यामार्फत काम करण्याचे ठरले होते आज रोजी ते काम पूर्ण झाले असून त्यांचे बिल ठराव असूनही सर्व सदस्यांचा अवमान करत ग्रामसेवक यांनी चेक नंबर 0518520 431570506 दिनांक 19/6/2020 दुकानदार माऊली कंट्रक्शन & बिल्डिंग मटेरियल सप्लायर यांच्या नावे 88468 रुपये चेक देऊन तो बाउन्स करण्यात आला व दुकानदाराची फसवणूक केली.  नियमाचे उल्लंघन केले त्यामुळे शिवसेना बी.एल.ओ.अविनाश पाटील डोणगावकर,सुभाष पाटील डोणगावकर ग्रामपंचायत सदस्य हे ग्रामपंचायत कार्यालय डोणगाव समोर 9/9/2020 सरण रचून आत्मदहन करणार आहे असं निवेदन ग्रामविकास मंत्री,जिल्हाधिकारी यांना देण्यात आले आहे.


सुपर फास्ट महाराष्ट्र न्यूज आमच्या पोर्टला व्हिसिट केल्याबद्दल आपले आभारी आहोत.जाहिरातीसाठी संपर्क करा.superfastmaharashtraa@gmail.com