सुपर फास्ट महाराष्ट्र न्यूज पोर्टल मध्ये आपले स्वागत आहे.जाहिरातीसाठी संपर्क करा.superfastmaharashtraa@gmail.com

आ.प्रशांत बंब यांचे गाव लासुर स्टेशन दोन दिवसा पासून अंधारात

 *सुपर फास्ट महाराष्ट्र न्यूज़ गंगापुर तालुका प्रतिनिधी फिरोज मन्सुरी शेख.....*


*आ.प्रशांत बंब यांचे गाव लासुर स्टेशन दोन दिवसा पासून अंधारात.....*



मराठवाड्यातील नंबर दोनची बाजारपेठ असलेल्या गंगापूर तालुक्यातील लासूर स्टेशन येथे गेल्या दोन दिवसा पासून वीज गुल झाल्याने गाव अंधारात असून महावितरण विभागाच्या अधिकाऱ्यांसह कर्मचार्यांचे ही मोबाईल स्वीच ऑफ आहेत.

               कायमच चर्चेत असलेल्या महावितरण विभागाचा ढिसाळ व भोंगल कारभार गाव अंधारात असल्याने अनेक शीतपेय व दुध डेअरी हॉटेल, व फ्रीजमध्ये असलेले नाशवंत पदार्थ मात्र खराब होत असल्याने नागरिकांसह व्यावसायिक मात्र पुरते वैतागले असून आव्वाच्या सव्वा असणारे  वीज देयक बिल नियमित भरून ही विजग्राहकाना मात्र नाहक त्रास सहन करावा लागत आहे त्यामुळे राजकीय सत्ताकेंद्र असूनही लोकप्रतिनिधींचा वचक या महावितरण विभागावर नसल्याचे दिसत आहे कारण गेल्या तीन वर्षांपासून येथील सब स्टेशन वर कायमस्वरूपी अभियंता नसल्याने अतिरिक्त कार्यभार असणाऱ्या अभियंताला दोष देऊन उपयोग नाही 

प्रतिक्रिया 


सुनील पाखरे :- (संचालक कृषी उत्पन्न बाजार समिती) लासुर स्टेशन येथे विज ग्राहक नियमित आव्वा च्या सव्वा बिल येऊन नियमित बिल भरणा ग्राहक भरतात तरीही विजेच्या समस्या भेडसावत असल्याने लोक त्रस्त आहेत त्यातच कहर म्हणजे गेल्या दोन दिवसांपासून लासुर स्टेशनसह सर्व परिसर अंधारात आहे अनेकांचे मोबाईल बंद आहे ज्युस सेन्टर,दूध डेयरी,शीतपेय, व इतर वेल्डिंग ,पाणी प्लॅन्ट यांनाही विजेच्या लंपांडवाने वैतागले आहेत त्यामुळे लासुर स्टेशनला जर कायमस्वरूपी अभियंता दिला नाही तर लोकशाही मार्गाने आंदोलन करून आमरण उपोषण करणार असल्याचेही पाखरे यांनी सांगीतले.

सुपर फास्ट महाराष्ट्र न्यूज आमच्या पोर्टला व्हिसिट केल्याबद्दल आपले आभारी आहोत.जाहिरातीसाठी संपर्क करा.superfastmaharashtraa@gmail.com