सुपर फास्ट महाराष्ट्र न्यूज पोर्टल मध्ये आपले स्वागत आहे.जाहिरातीसाठी संपर्क करा.superfastmaharashtraa@gmail.com

पाटबंधारे खात्याला दिला शेतकऱ्यानीं उपोषणाचा इशारा बंधारा उशाला आण दरवाजे नसल्याने कोरड घसाला.....

*सुपर फास्ट महाराष्ट्र न्यूज़ प्रतिनिधी‌ फिरोज मन्सुरी शेख लासुर स्टेशन......*


 पाटबंधारे खात्याला  दिला  शेतकऱ्यानीं उपोषणाचा इशारा बंधारा उशाला आण दरवाजे नसल्याने कोरड  घसाला.....



 गंगापूर व वैजापूर तालुक्याच्या सिमेवर असलेल्या शहाजतपुर गावाजवळ गंगापूर /वैजापूरची तालुक्याची जीवनदायिनी असलेल्या शिवना नदीवर  कोल्हापुरी बंधारा बांधलेला आहे मात्र या बंधार्याच्या मोर्याना लोखंडी दरवाजे
व रबर जॉइण्डंच्या कमतरते अभावी या बांधाऱ्यातील लाखो लिटर पाणी वाया जात आहे तसेच
हा  कोल्हापुरी बंधारा खुप जुना झाला असून याच्याकडे पाटबंधारे खात्याचे गेल्या दहा वर्षांपासून  लक्ष नसून      येथील शेतकरी प्लस्टिक व पोते,गोण्या,ताडपत्री लावून पाणी अडवण्याचा आटापिटा करत आहे सदरील शेतकऱ्यानीं वारंवार लेखी स्वरूपाचे निवेदन सरकारी दरबारी देऊनही सबंधित आधिकर्यानीं  लक्ष दिलेले नसल्याने या बंधाऱ्याच्या भींतीला मोठे तडे गेले असून  भींत  पडण्याची शक्यता आहे येथील शेतकऱ्यानीं गंगापूर व वैजापूरच्यावआमदारांना व शासकीय कार्यलयाना लेखी निवेदने वारंवार दिलेले आहे मात्र हे काम सरकारी खात्यांच्या लालफितीत अडकलेले आहे त्यामुळे गाव माझा न्यूज चैनलने आमच्या मागण्या शासन दरबारी मांडुन याचा पाठ पुरवा करावा अशी विनंती केली असून डोळ्यासमोरून लाखो क्युसेस पाणी वाहून जात असल्याने आमच्या पिकांच्या पाण्याचा व पिण्याचा पाण्याचा प्रश्न निर्माण होण्याची शक्यता नाकारता येत नाही म्हणून  आमच्या समस्याचे समाधान न केल्यास तीव्र  स्वरूपाचे आंदोलन करण्याचा इशारा येथील शेतकर्यानीं दिला आहे.
सुपर फास्ट महाराष्ट्र न्यूज आमच्या पोर्टला व्हिसिट केल्याबद्दल आपले आभारी आहोत.जाहिरातीसाठी संपर्क करा.superfastmaharashtraa@gmail.com