10 गुंठे टोमॅटो उपटून फेकले,लाखो रुपयांचे शेतकर्यांचे नुकसान.....*
*
*सुपर फास्ट महाराष्ट्र न्यूज़ गंगापुर तालुका प्रतिनिधी फिरोज मन्सुरी शेख....*
*10 गुंठे टोमॅटो उपटून फेकले,लाखो रुपयांचे शेतकर्यांचे नुकसान.....*
गंगापूर तालुक्यातील लासुर स्टेशन येथिल अनंतपूर शिवारातील गट नंबर 67 मध्ये किशोर कोठारी यांची शेतजमीन आहे या शेतात वैरागड येथील बाळू आसाराम शेजुळ यांनी वीस गुंठे टोमॅटो पिकाची लागवड तीन माहिन्यापूर्वी केली होती व दोन दिवसांपूर्वी टोमॅटोचा पहिला तोडा तोडला होता त्या टोमॅटोच्या प्रति वीस किलो कॅरेटला 800 रुपये भाव मिळाला होता आज त्यांना टोमॅटोचा दुसरा तोडा करायचा होता म्हणून शेतकरी बाळू शेजुळ हे शेतात गेले असता अंदाजे 10 गुंठे टोमॅतो अज्ञात इसमाने उपटून फेकल्याचे त्यांच्या निदर्शनास आले व टोमॅटोचे झाडाला लागलेले टोमॅटो काठीच्या साहाय्याने झोडपून खाली कच्या टोमॅटोचा खच पडलेला दिसल्याने शेतकऱ्याची झोपच उडाली कारण आज पुन्हा 80 ते 90 कॅरेट टोमॅटो काढून विक्रीसाठी पाठवायचे होते व आजपण प्रतिकॅरेट 800 रुपये भाव टोमॅटोचा होता त्यामुळे अंदाजे 50 हजार रुपयांचे नुकसान झाले असून यापुढे निघणारे उत्पन्नही बुडल्याने सदर शेतकरी मात्र पुरता कर्जबाजारी होणार आहे.
दरम्यान सदर शेतकऱ्याने सांगितले की टोमॅटोला लाखो रुपये खर्च केला असून अज्ञात व्यक्तीने माझे टोमॅटोचे अंदाजे 300 झाडे उपटून फेकल्याने आर्थिक नुकसान झाले आहे कारण बांबू,तार,औषध,बी-बियाणे यावर मी कर्ज काढून लागवड केली होती त्यामुळे सावकाराकडून घेतलेले कर्ज कसे फेडू या विवनचनेत मी असल्याने आत्महत्या शिवाय माझ्याकडे पर्याय नसल्याचेही शेजुळ यांनी सांगितले.
