खासदार उन्मेशजी पाटील यांचा कर्जत व्हर्चूअल सभेत
*खासदार उन्मेशजी पाटील यांचा कर्जत व्हर्चूअल सभेत
वार्ताहर कर्जत: कर्जत तालुका भाजपा विधानसभा समन्वयक पप्पूशेठ धोदाड यांनी सांगितले की
भारतीय जनता पार्टीच्या कर्जत विधानसभा व्हर्चूअल सभेच्या निमित्ताने खासदार उन्मेषजी पाटील यांनी अत्यंत महत्त्वाचे मा.प्रा. राम शिंदे हे विकासपुरुष म्हणुन उल्लेख*मार्गदर्शन केले . काही लोकांना देशाच्या प्रगती ,सुरक्षा,आत्मनिर्भरता- रोजगार, या विषयी प्रश्न वाटत असला तरी त्याचे उत्तर अतिशय सोपे असल्याचे मत खासदार साहेबांनी ४० मीनिटात स्पष्ट केले.
*राम मंदिर,कलम 370,कर्जत जामखेड तालुक्यातील विकासाचा , विषय ,या अशा सर्व मुद्द्याचे अतिशय हृदय स्पर्शी विवेचन केले* ते लिहायचे ठरवले तर चाळीस पाने कमी पडतील .
लोकसभा निवडणूकीत दिलेल्या आश्वासनाचीं पुर्तता करणारा पंतप्रधान हवा आहे. तेच ते मुद्दे पुन्हा रेटणारा नको, तुम्हाला- देशाला प्रगतिपथावर घेऊन जाणारा प्रधानसेवक हवा आहे , केवळ घराण्याचे हित पाहणारा नको , भारतीयत्वाची वज्रमूठ साकारणारा प्रधानसेवक हवा आहे, जातीपातीचे राजकारण करणारा नको, जनतेला स्वावलंबी करण्यासाठी झटणारा हवा आहे, दीड-दमडीसाठीही लाचार करू पाहणारा नको, रोजगार मागणारे नव्हे तर रोजगार देणारे व्हा म्हणणारा आत्मनिर्भर भारत करण्यासाठी २० लाख कोटी रुपये मंजूर करणारा हवा आहे, रोजगार नेमके कशाला म्हणतात हेही माहीत नसणारा नको, शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट करण्यासाठी परिश्रम घेणारा हवा आहे, ज्याचा शेतकऱ्यांना कसलाही फायदा होत नाही, त्या कर्जमाफीचा धोशा लावणारा नको, पाच वर्षांत नऊ कोटींहून अधिक शौचालयांची बांधणी करण्यासाठी पुढाकार घेणारा हवा आहे, लाल किल्ल्यावरील स्वच्छतेविषयक भाषणाची खिल्ली उडवणारा नको,
देशातल्या प्रत्येक गावात वीज नेणारा हवा आहे, वर्षानुवर्षे सत्ता भोगूनही जनतेला अंधारात ठेवणारा नको, गरिबालाही बँक व्यवहारांत सामावून घेणारा हवा आहे, त्यांना बँकिंगपासून दूर ठेवणारा नको ,भ्रष्टाचारावर हल्लाबोल करणारा हवा आहे, सत्तेत येताच कोट्यवधी रुपयांचा मलिदा खाणाऱ्यांचा सरसेनापती नको,
अनुदानाचे पैसे थेट लाभार्थ्यांच्या खात्यात जमा करणारा हवा आहे, एक रुपयांतले १५ पैसे लाभार्थ्यांपर्यंत पोहोचविणारा नको, जम्मू-काश्मीरसाठीचे कलम ३७० आणि कलम ३५ अ हटविणारा हवा आहे, ही कलमे जैसे थे ठेवणारा नको . देशद्रोह्यांना कठोरातील कठोर शिक्षा देण्यासाठी कटिबद्ध असणारा हवा आहे, देशद्रोहाचे कलमच रद्द करण्याचा मनसुबा बाळगणारा नको, सैन्यदलांना विशेष अधिकार देणारा अफस्पा कायदा कायम राखणारा हवा आहे, हा कायदाच नको म्हणणारा नको, धर्मांध जिहाद्यांना घरात घुसून मारणारा हवा आहे, देशाला धर्मांध इस्लामी दहशतवाद-नक्षलवादापेक्षा हिंदू दहशतवादाचा धोका जास्त असल्याचे बरळणारा नको,
*वचनाची पुर्ती करत रामजन्मभूमी वर राम मंदिर उभारणारा हवा आहे*, विरोध करणारा नको, मुस्लिम महिला वर अन्याय करणारा तीहेरी तलाक रद्द करणारा हवा आहे, विरोध करणारा नको, स्वातंत्र्यवीर सावरकरांचा सन्मान करणारा हवा आहे, त्यांची टवाळी करणारा नको,
*या सर्व उजव्या विचारसरणीच्या प्रधान सेवकांचे गुण- समर्थनीय नैतृत्व विकासपुरुष राम शिंदे साहेब यांच्या रूपाने कर्जत जामखेड मतदार संघातील जनतेला लाभले* आणि त्यांनी आपल्या पाच वर्षांच्या मंत्रिपदाच्या कार्यकाळात कित्येक वर्षिचा अनुशेष भरून काढण्यासाठी केलेली कामे उल्लेखनीय आहेत. *सर्व विकास कामे बोलायला गेलो तर दिवस ही पुरणार नाही अस्या पध्दतीने कामाची स्तुती केली*,व खालील कामे उल्लेखीत केली
कर्जत शहराचा पाणीप्रश्न सोडवण्यासाठी 28 कोटी रुपये मंजूर करून पाणी प्रश्न कायमचा सोडवला.
पाथर्डी - कर्जत - बारामती रस्ता मंजूर करुण त्यासाठी 200 कोटी रुपये निधी उपलब्ध करून दिला.
शासकीय कृषी महाविद्यालय मंजूरी व त्यासाठी 61 कोटी रुपये निधी उपलब्ध केला.
तुकाई चारी मंजूर करत
कुकडी प्रकल्पाला सुधारित प्रशासकीय मान्यता दिली त्यासाठी 3970 कोटी रुपये मंजूर केले.
जलयुक्त शिवार योजनेतून करोड रुपयांचा निधी मंजूर केला.
कर्जत तालुक्यात सुतगिरणीसाठी प्रशासकीय मंजुरी मिळवून दिली
सिद्धटेक येथील वीज विद्युत केंद्रास निधी मंजूर केला.
कर्जत तालुक्यातील बहुतांश रस्ते डांबरीकरण व मजबुतीकरणासाठी भरघोस निधीची तरतूद केली.
तीर्थ क्षेत्र विकासासाठी कोट्यवधी रुपयांचा निधी मंजूर केला या आणि अशा अनेक
विकास रुपी प्रश्नांनाची उत्तरे सोडवण्यासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा करत अतिशय कमी कालावधीत मतदार संघात विकासाची स्वप्ने पूर्ण करणारा नेता महाराष्ट्रातील कुठल्याही मतदार संघात नाही .
हे तुम्ही तुमच्या सद्सद्विवेक बुद्धीला विचारा व याचे उत्तर मिळेल हे आत्मविश्वासाने सांगितले .
दिशाभूल करणारे यंत्रनेला बळी पडु नका गल्लीसाठी नव्हे तर दिल्लीचे तख्त सांभाळण्यासाठी मजबुत नेतृत्वाला साथ द्या.
