सुपर फास्ट महाराष्ट्र न्यूज पोर्टल मध्ये आपले स्वागत आहे.जाहिरातीसाठी संपर्क करा.superfastmaharashtraa@gmail.com

शिवर "बु " व खुर्द या ठिकाणी.बोगस मजूराच्या नावे खोटे बिल काढल्याने तक्रार दाखल ???

शिवर "बु " व खुर्द या ठिकाणी.बोगस मजूराच्या नावे खोटे बिल काढल्याने तक्रार दाखल ???


सुपर फास्ट महाराष्ट्र न्यूज प्रतिनिधी अमरावती. सुबोध यु  मोहोड. मो.नं 9510136946.

जिल्हा धिकारी व वनमंत्री यांना तहसीलदार मार्फत तक्रार दाखल.

दर्यापूर तहसिल अर्तगत :-शिवर "बु" व खुर्द या ठिकाणी. महात्मा गांधी रोजगार हमी योजना. तसेच नरेगा सामाजिक वनीकरण डॉ. बाबासाहेब आंबेडकर रोपवाटिका व वनमोहत्सव मध्ये काम करणारे सर्व मजूर दिनांक 16 /05 /2018 ते दिनांक 19 /12 /2018 पर्यंत बोगस असल्याने. व  त्यांच्या नावे खोटे जाँब बनवून शासन तथा प्रशासनाची. तसेच सरकारची सुंध्दा फसवणूक केल्याचे  शिवर "बु" व खुर्द या ठिकाणी ग्रामस्था मध्ये चर्चा सुरू आहे. त्यामुळे डॉ. बाबासाहेब आंबेडकर रोपवाटिका व वनमोहत्सव रोपवाटिका येथे काम करणारे बोगस मजूर.  (1) भारती शामराव आटोटे जाँब क्रमांक MH 24-008 -700-001/19 ही महीला अंदाजे 25 वर्षा पासूनगावात हजर नसतांना सुंध्दा सामाजिक वनीकरण च्या कर्मचाऱ्यांनी या महीलेचे खोटे मष्टर अंदाजे  6 ते 7 महीण्याचे काढले. नं(2 ) रंगराव देवराव गेठे. जाँब क्रमांक MH 24-008- 700 -001 /25  नं. (3) मालती सुरेश उकरडे सुरेश जानराव उकळडे हे शिवर गावातील रहिवासी नसून हे दर्यापूर तालुक्यातील सुंध्दा रहिवासी नाहीत. त्यांचा जाँब क्रमांक.MH 24-008 -700 -001/447 आहे. नं. (5) वर्षा शंकर इंगळे. ( रोजगार सेवकाची पत्नी ) जाँब क्रमांक.MH 24 - 008 -700 -001/452. नं. (6) कमला किसन इंगळे. ( रोजगार सेवकाची आई.)MH 24-008 -700-001 /447 हे सर्व बोगस मजूर असून.कामावर न जाता. रोजगार सेवकाने आपल्या पदाचा गैरवापर करुन सामाजिक वनीकरणाच्या कर्मचाऱ्यां सोबत हातमिळवणी करून. व गोरगरीब मजूरांच्या पोटावर लात मारून आपल स्वतःचच पोट भरल्याचे चित्र दिसत आहे. तेव्हा हातावर पोट भरणाऱ्या लोकांनी अनेक वेळा. कामाची मागणी ग्राम सचिव तसेच सामाजिक वनीकरण विभाग. मध्ये तोंडी तसेच लेखी तक्रारी देऊन सुंध्दा मजूराची दखल आजपर्यंत कुठल्याही अधिकारी व पदाधिकारी यांनी घेतली नाही. तसेच कोरोना सारख्या महामारीत सुंध्दा मजूरांच्या हाताला काम नाही. तेव्हा हा भष्टाचार शासन तथा प्रशासनाच्या व सरकारच्या सुंध्दा लक्षात निर्देशनात आनून देण्यासाठी. गावातीलच सामाजिक चळवळी चे कार्यकर्ते चंद्रशेखर ह नितोने .व विनोद र. चौरपगार.व इतर सहकारी यांनी.वरील भष्टाच्याराला वाचा फोडण्यासाठी व गुन्हेगारांची ताबडतोब चौकशी करून कार्यवाही करुन दोषींवर गुंन्हे दाखल करावे अशी शासन व प्रशासनास विनंती केली आहे.
सुपर फास्ट महाराष्ट्र न्यूज आमच्या पोर्टला व्हिसिट केल्याबद्दल आपले आभारी आहोत.जाहिरातीसाठी संपर्क करा.superfastmaharashtraa@gmail.com