बोरी ते मोखाळा रस्ता लवकर सुरू करावा शेतकऱ्यांचे तहसीलदार यांना निवेदन. पोहना
बोरी ते मोखाळा रस्ता लवकर सुरू करावा शेतकऱ्यांचे तहसीलदार यांना निवेदन.
पोहनासमुद्रपूर:कोरा शिवारात येत असलेल्या बोरी ते मोखाळा रस्ता गेल्या काही दिवसांपासून बंद असल्याने शेतकऱ्यांना खूप अडचणीला सामोरे जावे लागत आहे.आणि पावसामुळे आता त्यांना आपल्या शेतात जाण्या-येणासाठी रस्ता नसल्याने त्यांच्या शेतात अजून पर्यन्त पेरणी झाली नाही.तेथिल शेतकऱ्यांनी तहसीलदार यांना आज निवेदन दिले आणि हे निवेदन जिल्हाधिकारी यांच्या पर्यन्त लवकरात पोहोचवावे आणि आम्हाला लवकरात लवकर उपाययोजना करून द्यावी अशी शेतकऱ्यांनी मागणी केली.
त्या प्रसंगी बाबाराव डंभारे,भास्कर जीवतोडे अंबादास लोखंडे आणि आवारी सर उपस्थित होते. *राहुल दुरतकर , वर्धा जिल्हा प्रतिनिधी*
