सुपर फास्ट महाराष्ट्र न्यूज पोर्टल मध्ये आपले स्वागत आहे.जाहिरातीसाठी संपर्क करा.superfastmaharashtraa@gmail.com

दिव्यमराठी संपादक वार्ताहर यांचे वरील गुन्हे मागे घेण्या साठी ग्रामीण पत्रकार संघा तर्फे तहसीदार यांना निवेदन.*

*दिव्यमराठी संपादक वार्ताहर यांचे वरील गुन्हे मागे घेण्या साठी ग्रामीण पत्रकार संघा तर्फे तहसीदार यांना निवेदन.*


सोयगाव:- औरंगाबाद शहरात कोरोना ने घातलेले थैमान यात प्रशासनाला आलेले अपयश याच्या बातम्या वृत्तपत्रात प्रकाशित झाल्या यात प्रशासनाचे कुठे चुकत आहे हे दाखविणे हा या मागचा उद्देश होता.जिल्हा प्रशासनाने मात्र याचे खापर माध्यमावर फोडले त्याचाच एक भाग म्हणून माध्यमांचा आवाज बंद करण्याचा प्रयत्न औरंगाबाद प्रशासनाकडून झाला.
एका मराठी वृत्त पत्रात "206 नागरिकांचे मारेकरी कोण" व "नापासांची फॊज:निर्णय घेण्यास कुठे चुकले" या मथळ्या खाली बातम्या प्रसारित करण्यात आल्या बातम्या चुकीच्या असल्याच कारण देत वृत्तपत्राचे संपादक,प्रकाशक,व प्रतिनिधी यांचे वर गुन्हे दाखल करण्यात आले.
वेळोवेळी पंतप्रधान,मुखमंत्री यांचे मार्फत वृत्तपत्रांनचे कौतुक करण्यात आले जिल्ह्याचे सत्य हे मांडायचे नाही का हाही प्रश्न आता उपस्थित होत आहे.याबाबत चा निषेध करून भारतीय ग्रामीण पत्रकार संघा मार्फत तहसीलदार सोयगाव यांना पत्रकार यांचे वरील दाखल झालेले गुन्हे मागे घेण्या साठी निवेदन देण्यात आले या वेळेस ज्ञानेश्वर वाघ,यादवकुमार शिंदे,दिलीपजी शिंदे,संदीप इंगळे, गुलाब पटेल,ईश्वर इंगळे,हे उपस्थित होते.

राहुल गायकवाड 
सुपरफास्ट महाराष्ट्र न्यूज 
सोयगाव तालुका प्रतिनिधी 

  • 7972755581

सुपर फास्ट महाराष्ट्र न्यूज आमच्या पोर्टला व्हिसिट केल्याबद्दल आपले आभारी आहोत.जाहिरातीसाठी संपर्क करा.superfastmaharashtraa@gmail.com