सुपर फास्ट महाराष्ट्र न्यूज पोर्टल मध्ये आपले स्वागत आहे.जाहिरातीसाठी संपर्क करा.superfastmaharashtraa@gmail.com

लासुर स्टेशन महावितरण कार्यलयासमोर शिवसेनेचे ठिय्या आंदोलन......*

*फिरोज मन्सुरी ,सुपरफास्ट महाराष्ट्र न्यूज गंगापूर तालुका प्रतिनिधी.....*

*लासुर स्टेशन महावितरण कार्यलयासमोर शिवसेनेचे ठिय्या आंदोलन......*


उपसभापती संपत छाजेड यांनी केले नेतृत्व.....


गंगापूर तालुक्यातील लासुर स्टेशन येथील महावितरण कंपनीचा भोगंळ कारभाराच्या विरोधात ग्रामस्थांच्या तक्रारीवरून आज गंगापूर पंचायत समितीचे  उपसभापती संपतजी छाजेड यांच्या नेतृत्वाखाली महावितरण कार्यलयात शिष्टमंडळाने भेट दिली असता तेथे कनिष्ठ अभियंता उपस्थित नसल्यामुळे तेथील कार्यलयासमोर र्धा तास ठिय्या करण्यात आले व  याबाबत कार्यकारी अभियंता गंगापूर यांच्या सोबत फोन वरून चर्चा करून येत्या सोमवारी आपल्या काय तक्रारी असतील त्याच निराकरण करू असे अश्वासन दिले.     

                   दरम्यान यावेळी मा.जि.प.सदस्य अनिल भैय्या जाधव,संतोष पा.जाधव,शिवसेना शहरप्रमुख नितीन पाटील कांजुणे,उपशहर प्रमुख अमोल शिरसाठ,अनिल घोडके,तुषार जाधव आदींसह शिवसैनिक व नागरिकांची उपस्थिती होती.
सुपर फास्ट महाराष्ट्र न्यूज आमच्या पोर्टला व्हिसिट केल्याबद्दल आपले आभारी आहोत.जाहिरातीसाठी संपर्क करा.superfastmaharashtraa@gmail.com