सुपर फास्ट महाराष्ट्र न्यूज पोर्टल मध्ये आपले स्वागत आहे.जाहिरातीसाठी संपर्क करा.superfastmaharashtraa@gmail.com

शिवसेना उप शहरप्रमुख संदिप पेंदोर यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून विविध समाज उपयोगी कार्यक्रम आयोजित करण्यात आलेले

शिवसेना उप शहरप्रमुख  संदिप पेंदोर यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून विविध समाज उपयोगी कार्यक्रम आयोजित करण्यात आलेले. 




वृषभ दरोडे  तालुका प्रतिनिधी /राळेगाव  ९०११३५६१४१

आज शिवसेना उप शहरप्रमुख, आसरा फाउंडेशन चे संचालक, माऊली वृद्धाश्रम सदस्य,
श्री. संदीप  पेंदोर यांच्या जन्म दिवसाचे औचित्य साधून विविध समाज उपयोगी कार्यक्रम आयोजित करण्यात आलेले.
महाराष्ट्राचे लाडके मुख्यमंत्री,
श्री. उद्धवजी साहेब ठाकरे यांच्या आदेशानुसार शेतकर्यांच्या बांदावर जाऊन शेतकरी, शेतमजूर कामगार महिलांना मास्क, सॅनिटाइजर, साबन ई. चा वाटप करण्यात आला व सर्व महीलांना नास्ता चहा, व मजूरांच्या मुलांसोबत केक कापून साजरा करण्यात आला.
या प्रसंगी शिवसेना शहरप्रमुख:- श्री राकेश भाऊ राऊळकर, जेष्ठ शिवसैनिक श्री.ह. भ .प. पदमाकर महाराज ठाकरे, श्री. सचिनसिंह चौहान, श्री चारुदत्त पाटील, श्री. कीरनभाऊ कूमरे , श्री बबलूभाऊ सैयद , श्री. मनोज भाऊ वाकूलकर, श्रीकांतभाऊ कोदाने , श्री. मोरेश्वर भाऊ डाखोरे आदी मंडळींची  उपस्थिती होती. दुसरीकडे विद्यार्थी सेना व युवासेना तर्फे सरकारी रुग्णालयात फळवाटप करण्यात आले, यावेळी युवासेना उपजिल्हा प्रमुख :-  रूग्नसेवक, जलदूत,सामाजिक कार्यकर्ते
उपस्थित  श्री.गणेशभाऊ बरडे यांचे तर्फे रूग्णांना फळवाटप करण्यात आले तसेच
आसरा फाऊंडेशन तर्फे गरजू लाभार्थ्याना कीटचे  वाटप  श्री. बाळाभाऊ धुमाळ,श्री.प्रकाशभाऊ खूडसंगे यांचे तर्फे करण्यात आले.
उपस्थितांना कोरोना बद्दल सतर्क कसे रहाता येईल असे मार्गदर्शन व आभार
 श्री संदीप  पेंदोर यांनी केले.

सुपरफास्ट महाराष्ट्र न्युज राळेगाव  तालुका प्रतिनिधी वृषभ दरोडे जाहिराती व बातम्या साठी संपर्क 
९०११३५६१४१
सुपर फास्ट महाराष्ट्र न्यूज आमच्या पोर्टला व्हिसिट केल्याबद्दल आपले आभारी आहोत.जाहिरातीसाठी संपर्क करा.superfastmaharashtraa@gmail.com