सुपर फास्ट महाराष्ट्र न्यूज पोर्टल मध्ये आपले स्वागत आहे.जाहिरातीसाठी संपर्क करा.superfastmaharashtraa@gmail.com

लासुर स्टेशन येथे गुटख्यावर मोठी कारवाई दीड लाखाचा गुटखा जप्त...

*सुपर फास्ट महाराष्ट्र न्यूज़ गंगापुर *प्रतिनिधी‌*  *फिरोज* *मन्सुरी* ( *शेख*) 



*लासुर स्टेशन  येथे गुटख्यावर मोठी कारवाई दीड लाखाचा गुटखा जप्त.....*


 शिल्लेगाव पोलिसांत दोन आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल...

आज रोजी  मोक्षदा पाटील ग्रामीण पोलीस अधीक्षक औरंगाबाद ग्रामीण  आणि अप्पर पोलीस अधीक्षक गणेश गावडे  यांच्या मार्गदर्शनाखाली उपविभागीय पोलीस अधिकारी संदीप गावित  व  शिल्लेगाव पोलिसांना गुप्त बातमीदारमार्फत  माहिती मिळाली होती की जय महेश ट्रेडर्स (गीताबन) लासुर स्टेशन येथे गुटखा विक्री करीत आहे व काही गोडाऊन  मध्ये स्टॉक असलेला  गुटखा  विक्रीस ठेवला आहे यावरून पोलीस स्टाफसह लासुर येथे नमूद दुकानावर छापा मारून झडती घेतली असता  विविध गुटखा पदार्थ रुपये 1,50, 000 रुपयाचा  मुद्देमाल मिळून आला असून दोन आरोपी  रा.लासुर स्टेशन ताब्यात घेऊन शिल्लेगाव   पोलिस ठाण्यात आणण्यात आले असून  नोंद  घेऊन कायदेशीर कारवाई  व अन्न  व औषध प्रशासनचे सांबांधितास  ही  पुढील  कारवाई कामी कळवले आहे सदरची कारवाई मा.उपविभागीय पोलीस अधिकारी श्री संदीप गावित साहेब शिल्लेगाव पोलीस ठाण्याचे  पो नि सय्यद शौकत अली सय्यद, पो.उपनिरिक्षक सतीश दिंडे, आणि स्टाफ पो.नाईक सुनील दांडगे,कैलास राठोड, हरी नरके, गायकवाड, दाभाडे ,उदे, चालक पंडित,   अमोल करवंदे, चालक रामेश्वर काळे यांनी  केली आहे
सुपर फास्ट महाराष्ट्र न्यूज आमच्या पोर्टला व्हिसिट केल्याबद्दल आपले आभारी आहोत.जाहिरातीसाठी संपर्क करा.superfastmaharashtraa@gmail.com