लोहा शहरात कोरोनाचा शिरकाव
लोहा शहरात कोरोनाचा शिरकाव
नगराध्यक्षाच्या आव्हानाला जनतेची साथ
तीन दिवसासाठी शहर कडकडीत बंद
लोहा ,तब्बल तीन महिन्यानंतर लोहा शहरात कोरोनाचा शिरकाव झाला असल्याने तालुक्यात खळबळ उडाली आहे या आजाराचा प्रारदुर्भाव वाढू नये म्हणून वेळीच खबरदारी घेण्यासाठी तहसीलदार नगराध्यक्ष मुख्याधिकारी पोलीस प्रशासन यांची तातडीची बैठक झाली आणि शहर तीन दिवसासाठी बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला दि. 22 रोजी रात्री लोकनियुक्त नगराध्यक्ष गजानन सूर्यवंशी यांनी शहरातील जनतेला व्यापाऱ्यांना बंद बाजारपेठ बंद ठेवण्याचे आव्हान केले होते त्यांच्या आवाहनाला जनतेनी शंभर टक्के साथ दिली असून 23 रोजी शहरातील बाजारपेठ कडकडीत बंद ठेवण्यात आली शहरात सर्वत्र शुकशुकाट दिसून येत आहे
कोरोना विषाणूच्या सनर्गजन्य आजाराने गेल्या तीन महिन्यापासून देशात राज्यात थैमान घातले आहे. या आजाराचा प्रारदुर्भाव पसरू नये म्हणून केंद्रासह राज्य सरकारने लाँकडाऊन जाहीर केले परंतु या आजाराचा शिरकाव नांदेड जिल्ह्यात दोन महीने झाला नव्हता पण एक महिन्यांपूर्वी कोरोना जिल्ह्यात आला आणि तीनशे रुग्ण झाले .आज तबल 40जन काँरनटाईन केले लोहा सु.फा.प्र.नि. ससाणे
