बाळापूर च्या मन नदीत प्रेमी युगलाची आत्महत्या
बाळापूर च्या मन नदीत प्रेमी युगलाची आत्महत्या
सुपरफास्ट महाराष्ट्र न्यूज प्रतिनिधी अकोला,. :- बाळापूर,नेशनल हायवे नं 6 वरील मन नदीत आज दुपारी 4.30 च्या सुमारास काही जणांना एक प्रेमी युगल पाण्यावर तरंगताना काही दिसलें त्यांनी आत्महत्या केली असा प्राथमिक अंदाज पोलिसांनी वर्तविला आहे. त्या नुसार बाळापूर पोलिसांनी मर्ग दाखल केला आहे.
सदर मुलगा खामगाव येथिल शिवाजी नगर सुटाळा बु. येथील अक्षय अशोक घरत वय 20 वर्ष असल्याचे समजते. अक्षय अशोक घरत गेल्या दोन दिवसापासुन बेपत्ता असुन तो आईवडिलांचा एकुलता एक मुलगा असुन त्याच्या वडिलांनीही आत्महत्या केली होती असे समजते. गेल्या दोन दिवसापासुन तो बेपत्ता असुन त्याच्या नातेवाईकाकडुन शोध घेण्यात आला होता. मुलाचे मामा हे सुंदरखेड येथील रहिवासी आहे. त्याची आई ही घरी एकटीच आहे. त्याची प्रियसी कोमल राजू बाजड वय 17 रा. धाबा ता. लोणार जि. बुलढाणा येथील असल्याचे समजते. सदर मुलगी अकोला येथील हरिहर पेठ परिसरात आपल्या आजी कडे राहत होती. ती एका ज्वलर्स च्या दुकानात काम करत असल्याचे हि समजते. त्यांनी काल नेशनल हायवे 6 वरील एका धाब्या जवळ मन नदित उडी मारून आत्महत्या केली असल्याचा अंदाज वर्तविला जात आहे. आज दुपारी 4.30 च्या सुमारास मन नदीत साजिद इकबाल, मोहम्मद साद, मोहम्मद फैझान, इम्रान खान, आरिफ शाह यांना प्रेत तरंगताना दिसलें त्यांनी सदर घटनेची माहिती बाळापूर पोलीस ठाण्यात देताच ठाणेदार नितीन शिंदे, पोलीस उपनिरीक्षक वासाडे यांच्या सह काही पोलीस कर्मचारी घटना स्थळी पोहचून त्या युवकांनी त्यांच्या समोर सदर प्रेमी युगलाला बाहेर काढले. व पोलिसांनी पंचनामा केला. पोलीसांनी दोघांचे मोबाईल ताब्यात घेतले असुन त्यांचे मृतदेह अकोला येथे शव विच्छेदन करता पाठविण्यात आले आहे. *सुपरफास्ट महाराष्ट्र न्यूज* प्रतिनिधी अंकित मोहोड. मो. 7774862821.
